शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी बाजार समितीसाठी ९५.४१ टक्के मतदान

By admin | Updated: September 15, 2015 03:38 IST

जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या चामोर्शी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सोमवारी

चामोर्शी : जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या चामोर्शी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सोमवारी प्रचंड उत्साहात मतदान पार पडले. ९५.४१ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला. १५ सप्टेंबर रोजी या निवडणुकीची मतमोजणी चामोर्शी येथील शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात होणार आहे.गडचिरोली जिल्हा परिषदेचे बांधकाम, वित्तसभापती तथा बाजार समितीचे अध्यक्ष राहिलेले अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलचा थेट सामना भारतीय जनता पक्षाच्या पॅनलशी झाला. ग्रामपंचायत मतदार संघात सहा मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. कुनघाडा मतदान केंद्रावर ९९ पैकी ९०, चामोर्शी मतदान केंद्रावर २५८ पैकी २३९, घोट मतदान केंद्रावर १६६ पैकी १२८, मुलचेरा मतदान केंद्रावर ७५ पैकी ७२, आष्टी मतदान केंद्रावर १८७ पैकी १७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. एकूण ७८५ पैकी ७०७ म्हणजे ९० टक्के मतदारांनी ग्रामपंचायत मतदार संघात मतदान केले. सेवा सहकारी संस्था मतदार संघात कुनघाडा मतदान केंद्रावर ५५ पैकी ५१, चामोर्शी २४३ पैकी २३४, घोट १०० पैकी ९३, मुलचेरा २९ पैकी २७ तर आष्टी मतदान केंद्रावर १२८ पैकी १२६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला. ग्रामपंचायत मतदार संघात ५५५ पैकी ५३४ मतदारांनी म्हणजेच ९६.२२ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला.हमाल मापारी मतदार संघात कुनघाडा बुथवर ५८, चामोर्शी बुथवर १४९ असे एकूण २०७ मतदारांनी मतदान केले. १०० टक्के मतदान या गटात झाले. निवडणुकीपूर्वी व मतदानादरम्यान तणावपूर्ण वातावरण असले तरी मतदान शांततेत पार पडले.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रवीण निवावे यांनी काम पाहिले. मतदानादरम्यान पोलीस निरीक्षक किरण अवचार यांच्या मार्गदर्शनात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (तालुका प्रतिनिधी)