शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

८ जूनला कोकडी येथे दमा औषधी वितरण

By admin | Updated: May 29, 2014 02:16 IST

देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथील प्रसिध्द वैद्यराज प्रल्हाद कावळे हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी ..

तुळशी : देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथील प्रसिध्द वैद्यराज प्रल्हाद कावळे हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी म्हणजे ८ जूनला सकाळी ११ ते रात्री १२ वाजेपर्यंत रूग्णांना मासोळीतून नि:शुल्क दमा औषधी वितरीत करणार आहेत. या दिवशी कोकडी येथे विदर्भातील दमा रूग्णांचा कुंभमेळा भरणार आहे.

वैद्यराज प्रल्हाद कावळे गेल्या १0-१२ वर्षापासून सतत कोकडी येथे आपल्या स्वगावी हजारो दमा रूग्णांना मासोळीतून नि:शुल्क दमा औषधी देऊन आरोग्य सेवा देत आहेत. दरवर्षी ते मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी दमा औषधी वितरीत करतात. एकाच दिवशी दमा औषधीचे वितरण होत असल्याने कोकडी येथे विदर्भासह महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, छत्तीसगड व अन्य राज्यातील लाखो दमा रूग्ण येतात. यासाठी गावातील नागरिकही आवश्यक ते सर्व सहकार्य करतात. विशेष म्हणजे गावातील नागरिकच मासोळी उपलब्ध करून देतात. पोलीस प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो. तालुका प्रशासनासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही या उपक्रमासाठी हातभार लावतात. सकाळी ११ वाजतापासून रात्री १२ वाजेपर्यंत दमा रूग्णांचा ओघ या ठिकाणी कायम दिसतो. वैद्यराज प्रल्हाद कावळे यांच्या दमा औषधीने हजारो दमा रूग्ण बरे झाले आहेत. कावळे यांच्या औषधीने पूर्णत: बरे झाल्याच्या प्रतिक्रिया अनेक दमा रूग्णांनी व्यक्त केल्या आहेत.