शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

८९,९६० बालकांना देणार पोलिओ डोज

By admin | Updated: January 26, 2017 01:49 IST

गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी पहिल्या टप्प्यात २९ जानेवारी रोजी रविवारला पल्स पोलिओ मोहिमेचा पहिला टप्पा आयोजित करण्यात आला आहे.

२ हजार ३०८ केंद्रांवर सुविधा : २९ जानेवारीला पहिल्या टप्प्यातील लसीकरण गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी पहिल्या टप्प्यात २९ जानेवारी रोजी रविवारला पल्स पोलिओ मोहिमेचा पहिला टप्पा आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी शून्य ते पाच वर्ष वयोगटातील जिल्हाभरातील एकूण ८९ हजार ९६० बालकांना पल्स पोलिओचा डोज पाजण्यात येणार आहे. एकही मूल पल्स पोलिओच्या लसीकरणापासून वंचित राहू नये, याकरिता आरोग्य विभागाच्या वतीने शहरी व ग्रामीण भागात एकूण २ हजार ३०८ केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात आरोग्याची समस्या गंभीर झाली आहे. कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू, सिकलसेल तथा इतर आजारांची समस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्याची सुविधा पोहोचविण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. राज्य सरकारच्या निर्देशानुसार दरवर्षी पल्स पोलीओ मोहीम जिल्ह्यात राबविली जाते. यावर्षी पहिल्या टप्प्यात २९ जानेवारीला तर दुसऱ्या टप्प्यात २ एप्रिल रोजी शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना पोलीओ डोज देण्यात येणार आहे. पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे संपूर्ण तयारी व व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांनी बुधवारी त्यांच्या कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. (स्थानिक प्रतिनिधी) ग्रामीण भागात ८२ हजार बालके पल्स पोलीओ मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात विशेष सुविधा करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात २ हजार २४४ तर शहरी भागात ६४ असे एकूण २ हजार ३०८ केंद्रांची सुविधा लसीकरणासाठी करण्यात आली आहे. १७६ ट्राझिम टीम करण्यात आली असून ९५ मोबाईल टीमची व्यवस्था राहणार आहे. जिल्हाभरात शून्य ते पाच वर्ष वयोगटातील एकूण ८९ हजार ९६० बालकांची संख्या आहे. यामध्ये ग्रामीण भागात ८२ हजार १३२ तर शहरी भागात ७ हजार ८२८ बालकांचा समावेश आहे.