शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

८८५ आपद्ग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेतच

By admin | Updated: November 16, 2014 22:49 IST

१ जून ते ९ सप्टेंबर २०१४ दरम्यान पावसाळ्यात जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन यंदा

गडचिरोली : १ जून ते ९ सप्टेंबर २०१४ दरम्यान पावसाळ्यात जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन यंदा जिल्ह्यात १० नागरिक मृत्यूमुखी पडले. तर एकूण ७५ लहान, मोठे जनावरे मृत पावली. तसेच १ हजार ६३८ घरांची पडझड झाली. यापैकी प्रशासनाने अर्ध्यापेक्षा अधिक आपद्ग्रस्तांना आर्थिक मदत दिली आहे. तर ८८५ आपद्ग्रस्त नागरिक अद्यापही आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेतच आहेत. विशेष म्हणजे पूरपरिस्थिती मृत्यू झालेल्या एका नागरिकाचा मृतदेह अद्यापही सापडला नसल्याने प्रशासनाकडून या आपद्ग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत मिळू शकली नाही.यंदाच्या अतिवृष्टी व पूरपरिस्थिीमुळे जिल्ह्यात एकूण १० नागरिक दगावले. यापैकी प्रशासनाने ९ मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दीड लाख रूपयांप्रमाणे १३ लाख ५० हजार रूपयांची आर्थिक मदत प्रदान केली आहे. तर एकाचा मृतदेह न सापडल्याने दीड लाख रूपये मदत देणे शिल्लक आहे. अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात एकूण १६ नागरिक जखमी झाले. सर्व जखमी नागरिकांना प्रशासनाने एकूण १ लाख १२ हजार रूपयांची मदत दिली आहे. अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील लहान २८ व मोठे ४७ असे एकूण ७५ जनावरे मृत्यूमुखी पडली. यापैकी ७२ जनावर मालकांना ६ लाख १९ हजार रूपयांची मदत प्रशासनाने दिली आहे. तर तीन नुकसानग्रस्त जनावर मालक मदतीच्या प्रतीक्षेत आहे. या जनावर मालकांना प्रत्येकी १० हजार रूपये असे एकूण ३० हजार रूपये आर्थिक मदत देणे बाकी आहे. यंदाच्या पावसाळ्यात १ हजार ५८८ घरे अंशता तर ५० घरे पूर्णत: असे एकूण १ हजार ६३८ घरांची पडझड झाली. यापैकी ७८४ पडझड झालेल्या घरमालकांना २२ लाख २५ हजार ४८८ रूपयांची आर्थिक मदत प्रशासनाने दिली आहे. तर अंशत: घरे पडलेली ८२७ व पूर्णत: घरे पडलेली २७ असे एकूण ८५४ घरांची पडझड झालेले घरमालक अद्यापही आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहे. ८५४ घरमालकांना २० लाख ९ हजार ६० रूपयांची आर्थिक मदत देणे बाकी आहे. राज्य शासनाकडून दरवर्षी आपद्ग्रस्तांसाठी आर्थिक मदत दिली जाते. यासाठी पावसाळ्यापूर्वीच निधीची तरतूद केली जाते. मात्र गाव, तलाठी साजा व तहसील कार्यालयातील ढिसाळ नियोजनामुळे आपद्ग्रस्तांच्या पंचनाम्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे उशीरा पोहोचल्यामुळे अनेक आपद्ग्रस्त नागरिक आर्थिक मदतीपासून वंचित असल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)