शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वडसातील ८७ अंगणवाडी केंद्र बनले डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:18 IST

केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे आयईसीडीएस प्रणालीला मजबूत करण्यासाठी व पोषण सुधार करण्याकरिता संपूर्ण भारतभर ‘राष्ट्रीय पोषण मिशन’ च्या माध्यमातून आयसीडीसी-कॅश (कॉमन अप्लिकेशन सॉफ्टवेअर) विकसीत करण्यात आले आहे.

ठळक मुद्देअंगणवाडी सेविकेला नेट रिचार्ज मिळणार : ‘कॅश’ अप्लिकेशनद्वारे भरणार आॅनलाईन माहिती

विष्णू दुनेदार।लोकमत न्यूज नेटवर्कतुळशी : केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे आयईसीडीएस प्रणालीला मजबूत करण्यासाठी व पोषण सुधार करण्याकरिता संपूर्ण भारतभर ‘राष्ट्रीय पोषण मिशन’ च्या माध्यमातून आयसीडीसी-कॅश (कॉमन अप्लिकेशन सॉफ्टवेअर) विकसीत करण्यात आले आहे. याची तालुकास्तरावर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाकडे देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन, सिमकार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच ८७ अंगणवाडी केंद्र डिजिटल बनले आहेत.देसाईगंज तालुक्यात एकूण ८७ अंगणवाडी केंद्र असून सर्व केंद्रातील अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन व सिमकार्ड देण्यात आले. शिवाय दर तीन महिन्यांकरिता नेट रिचार्जसाठी प्रत्येक अंगणवाडी सेविकेला ४०० रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन हाताळणीचे ज्ञान अवगत करणे आवश्यक आहे. यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण चार टप्प्यात दिल्या जाणार आहे. प्रशिक्षणाचा एक टप्पा देसाईगंज तालुक्यात पूर्ण झाला आहे.एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी एन.ए. कुचिक यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका आशा वानखेडे, गट समन्वयक विशाल शिंदे, मुख्य प्रशिक्षक देवांगना साखरकर, सविता बुद्धे, दीक्षा मेश्राम हे अंगणवाडी सेविकांना मोबाईल प्रशिक्षण देत आहेत.कॅश हे एक मोबाईल अप्लिकेशन असून त्याद्वारे अंगणवाडी केंद्राच्या प्रत्येक लाभार्थीची आॅनलाईन नोंद करणे, रियल टाइम डेटाचा उपयोग करताना रिपोर्ट व डॅशबोर्ड प्रदान करणे, सेविकाद्वारे प्रदान करण्यात येणाऱ्या सेवांच्या गुणवत्तेचा पाठपुरावा करताना आवश्यक सुधारणा करणे, लाभार्थ्यांना पोषण व स्वास्थ्य स्थितीबाबत अलर्ट संदेश पोहचविणे, सेविकांमार्फत वापरात असलेले सर्व रजिस्टर बंद करणे व त्यांच्या कामाची क्षमता वाढविणे, इतर विभागासोबत डिजिटल समन्वय राखणे आदी कामे याद्वारे होणार आहेत. एकूणच अंगणवाडी केंद्राचा कारभार आता हायटेक होणार आहे.११ रजिस्टरमध्ये नोंदवावी लागत होती माहितीपूर्वी अंगणवाडी सेविकांना वेगवेगळ्या ११ रजिस्टर मध्ये माहिती लिहून ती प्रकल्प स्तरावर सादर करावी लागत असे. हे काम वेळखाऊ व खूप जिकीरीचे होते. परंतु आता अंगणवाडी सेविका मोबाईलद्वारे पोषण आहार स्थिती, कुटुंब व्यवस्थापन, दैनिक आहार, गृहभेट नियोजन, वाढ देखरेख, शिधा वाटप नोंद, अंगणवाडी केंद्र व्यवस्थापन, मासिक प्रगती अहवाल आदी माहिती रजिस्टरमध्ये नमूद करावी लागत होती. मात्र आता ही सर्व माहिती कॅश अप्लिकेशनद्वारे आॅनलाईन भरण्यात येणार आहेत. त्यामुळे खºया अर्थाने आता अंगणवाड्या डिजिटल बनणार आहेत. सेविकांच्या कामात आता गती येणार आहे.सुरूवातीला ज्या सेविकांना स्मार्ट फोन वापराबद्दल माहिती नव्हती. त्यांच्या मनात याबाबत थोडी भीती होती. परंतु प्रशिक्षकामार्फत प्रत्येक सेविकेला समजेल, अशा भाषेत समजावून सांगितले जात असून याकरिता प्रोजेक्टरचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे सेविकेच्या मनातील भीती कमी झाली असून त्या चांगल्या प्रकारे स्मार्ट फोन हाताळत आहेत.- निर्मला कुचिक,बालविकास प्रकल्प अधिकारी, देसाईगंज

टॅग्स :digitalडिजिटल