शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात एकाच महिन्यात मलेरियाचे ८,०६५ रूग्ण

By admin | Updated: December 9, 2014 22:49 IST

२०१४ च्या जानेवारी ते आॅक्टोबरच्या अखेरपर्यंत दहा महिन्यांच्या कालावधीत जिल्हाभरात ८ हजार ५१६ मलेरिया पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले होते. मात्र नोव्हेंबर महिन्यात मलेरियाची लागण अधिक

गडचिरोली : २०१४ च्या जानेवारी ते आॅक्टोबरच्या अखेरपर्यंत दहा महिन्यांच्या कालावधीत जिल्हाभरात ८ हजार ५१६ मलेरिया पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले होते. मात्र नोव्हेंबर महिन्यात मलेरियाची लागण अधिक असल्याचे निदर्शनास येत असून नोव्हेंबर या एकाच महिन्यात बाराही तालुक्यात एकुण ८ हजार ६५ मलेरिया पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याने जिल्ह्याला अद्यापही मलेरियाचा विळखा कायम असल्याचे दिसून येते. मलेरियाच्या साथीला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्याच्या आरोग्य विभागामार्फत जिल्हा, तालुकासह ग्रामीण व दुर्गम भागात विशेष शिबिर आयोजित करून तपासणी व औषधोपचार केला जात आहे. मात्र मलेरिया हा रोग झटपट बरा होणारा नसल्याने मलेरियाची साथ आटोक्यात येण्यासाठी पुन्हा काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एकुण ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. तसेच ३०० हून अधिक उपकेंद्र आहेत. आरोग्य विभागाच्या सर्व संस्था व जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयामार्फत मलेरियाची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अहेरी तालुक्यात १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आरोग्य विभागाच्यावतीने एकुण ७ हजार ११४ नागरिकांचे रक्त नमुने घेण्यात आले. यामध्ये पीव्ही स्वरूपाचे ७७ व पीएफ स्वरूपाचे ४७३ असे एकुण ५५० मलेरिया पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. आरमोरी तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात एकुण ४ हजार ४०६ नागरिकांचे रक्त नमुने घेण्यात आले. यात पीव्ही स्वरूपाचे ९ व पीएफ स्वरूपाचे ७० असे एकुण ७९ मलेरिया पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. एटापल्ली तालुक्यात एकुण ८ हजार ८६३ नागरिकांचे रक्त नमुने घेण्यात आले. यात पीव्ही स्वरूपाचे १६८ व पीएफ स्वरूपाचे १ हजार ८८९ असे एकुण २ हजार ४७ मलेरिया पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. भामरागड तालुक्यात एकुण ४ हजार ३६७ नागरिकांचे रक्त नमुने घेण्यात आले. यात पीव्ही स्वरूपाचे ५४ व पीएफ स्वरूपाचे ७८१ असे एकुण ८३५ रूग्ण आढळून आले. चामोर्शी तालुक्यात एकुण ८ हजार ७७६ रक्त नमुने घेण्यात आले. यामध्ये पीव्ही स्वरूपाचे ५४ व पीएफ स्वरूपाचे ४१८ असे एकुण ४७२ मलेरिया पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. धानोरा तालुक्यात १९ हजार ८४३ रक्त नमुन्यांमध्ये पीव्ही स्वरूपाचे १५१ व पीएफ स्वरूपाचे २ हजार २७३ असे एकुण २ हजार ४२४ रूग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. गडचिरोली तालुक्यात ७ हजार २५ रक्त नमुन्यांमध्ये पीव्ही स्वरूपाचे २७ व पीएफ स्वरूपाचे १२३ असे एकुण १५० रूग्ण पॉझिटीव्ह आढळले. कोरची तालुक्यात एकुण ४ हजार ७७३ रक्त नमुने घेण्यात आले. यामध्ये पीव्ही स्वरूपाचे ४७ व पीएफ स्वरूपाचे ५११ असे एकुण ५५८ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. कुरखेडा तालुक्यात १० हजार ५५७ रक्त नमुन्यांमध्ये पीव्ही स्वरूपाचे ४५ व पीएफ स्वरूपाचे ५२५ असे एकुण ५७० रूग्ण पॉझिटीव्ह आढळले. मुलचेरा तालुक्यात ३ हजार २०० रक्त नमुन्यांमध्ये पीव्ही स्वरूपाचे २० व पीएफ स्वरूपाचे १३४ असे एकुण १५४ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. सिरोंचा तालुक्यात ४ हजार ७२३ रक्त नमुन्यांमध्ये पीव्ही स्वरूपाचे ४६ व पीएफ स्वरूपाचे १६८ असे एकुण २१४ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. देसाईगंज तालुक्यात २ हजार ९३६ नागरिकांचे रक्तनमुने घेण्यात आले. यामध्ये १२ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. (स्थानिक प्रतिनिधी)