शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलांसाठी ८६ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 23:26 IST

गडचिरोली शहरातील गोकुलनगर, विवेकानंदनगर व फुले वॉर्डातील १ हजार २६४ घरांसाठी केंद्र शासनाने सुमारे ८६ कोटी २५ लाख ६३ हजार रूपयांचा निधी मंजूर केला आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री आवास योजना : गोकुलनगर, विवेकानंदनगर व फुले वॉर्डांचा समावेश

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : गडचिरोली शहरातील गोकुलनगर, विवेकानंदनगर व फुले वॉर्डातील १ हजार २६४ घरांसाठी केंद्र शासनाने सुमारे ८६ कोटी २५ लाख ६३ हजार रूपयांचा निधी मंजूर केला आहे. २९ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे घरकुलासंदर्भात सभा झाली आहे. या सभेला मुख्याधिकारी कृष्णा निपाने उपस्थित होते. याच सभेत घरकुलांना मंजुरी देऊन निधी मंजूर करण्यात आला.सर्वांना घर उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत गडचिरोली शहरातील गोकुलनगर व विवेकानंद नगराचे १४ सप्टेंबर २०१६ रोजी सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये गोकुलनगरातील ८०० व स्वामी विवेकानंद नगरातील २०८ घरे कच्चे असल्याचे आढळून आले. या नागरिकांना घरे मिळावे यासाठी नगर परिषदेने डीपीआर तयार केला आहे. सदर डीपीआर मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला. फुले वार्डातील २५६ लाभार्थ्यांच्या घरकुालाचा प्रस्ताव तयार करून सदर प्रस्ताव सुध्दा केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला. या संदर्भात नवी दिल्ली येथे २९ नोव्हेंबर रोजी आढावा सभा पार पडली. या सभेत तिन्ही वार्डातील घरकुलांच्या बांधकामाला परवानगी देऊन त्यासाठी निधी मंजूर केला आहे.ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना मागील वर्षीपासूनच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल बांधून दिले जात आहे. शहरात मागील वर्षीचे सर्वेक्षण झाले होते. त्यानंतर वर्षभराचा कालावधी उलटूनही घरकूल मिळाले नव्हते. नागरिक वेळोवेळी नगर परिषदेमध्ये येऊन विचारणा करीत होते. वर्षभराच्या कालावधीनंतरही घरकूल न मिळाल्याने घरकूल मिळणार किंवा नाही, अशी शंकाही उपस्थित केली जात होती. मात्र घरकुलांना मंजुरी नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. जागा कमी असल्यास २३.७४ व जागा जास्त असल्यास २८.३ चौरस मीटरवर घराचे बांधकाम आवश्यक राहणार आहे. बांधकामाचे क्षेत्रफळ नगर परिषदेचे कर्मचारी संबंधित लाभार्थ्याला आखून देणार आहेत. तेवढे बांधकाम गरजेचे आहे.राज्यातील अभिनव उपक्रमगोकुलनगर व विवेकानंदनगर शासकीय जागेवर वसले आहेत. अतिक्रमीत जागेवर घरकूल दिले जात नाही. मात्र नगर परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती करून सदर जागा नगर परिषदेकडे हस्तांतरीत करण्याची मागणी केली. सदर मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर नगर परिषद नागरिकांना त्यांच्या जागेचे पट्टे वाटप करणार आहे. शासकीय जागेवर घरकूल देणारी गडचिरोली नगर परिषद ही एकमेव नगर परिषद आहे.कर्जही मिळणारघरकूल लाभार्थ्याला २ लाख ५० हजार रूपयांचे अनुदान दिले जाणार आहे. शहरी भागात सदर रक्कम अपुरी असल्याने सहा लाख रूपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. त्यावर ६.५ टक्के एवढे व्याजदर आकारले जाईल.१ हजार २६४ घरांसाठी मिळणार निधीघरकुलासाठी केंद्र शासनाकडून महिनाभराच्या कालावधीत निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. गोकुलनगर व विवेकानंदनगरातील जागा नगर परिषदेकडे हस्तांतरित करणे यासाठी थोडाफार विलंब होण्याची शक्यता आहे. फुले वॉर्डातील नागरिकांची घराची जागा स्वत:ची असल्याने या वार्डाबाबत काहीच अडचण नाही.खासदार व नगर परिषदेचे प्रयत्नशासकीय जागेवर घरकूल देणे ही राज्यातील पहिलीच योजना आहे. सदर शासकीय जागा नगर परिषदेकडे हस्तांतरीत करणे व या घरकुलांना दिल्ली दरबारी मंजुरी मिळवून देणे यासाठी खासदार अशोक नेते यांनी प्रयत्न केले. प्रत्येक कुटुंबाला निवारा हे भाजप सरकारचे ध्येय असून २०२२ पर्यंत प्रत्येक कुटुंबाला घर उपलब्ध करून देण्यासाठी वाटचाल सुरू आहे. भाजप सरकार जनतेला दिलेला शब्द पूर्णपणे पाळत आहे. त्यामुळे विकासाची गती वाढली आहे, अशी प्रतिक्रिया खासदार अशोक नेते यांनी लोकमतशी बोलताना दिली.