शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

८५ लाखांची वीज चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:22 IST

गडचिरोली मंडळात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत सुमारे ८५ लाख १९ हजार रूपयांची वीज चोरी उघडकीस आली आहे. ६५४ वीज चोरांवर महावितरणने कारवाई केली आहे.

ठळक मुद्दे९ महिन्यांतील स्थिती : ६५४ वीज चोरांवर केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली मंडळात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत सुमारे ८५ लाख १९ हजार रूपयांची वीज चोरी उघडकीस आली आहे. ६५४ वीज चोरांवर महावितरणने कारवाई केली आहे.वीज चोरीला आळा घालण्यासाठी वीज विभागातर्फे नवनवीन तंत्रज्ञान आणले जात आहे. मात्र काही वीज चोर त्याहूनही पुढे असून महावितरणच्या डोळ्यात धूळ झोकत वीज चोरी करीत आहेत. जेवढी वीज निर्मिती होते. त्यापैकी काही प्रमाणात विजेची गळती झाली तरी प्रमाणाच्या अधिक गळती होऊ नये, यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महावितरणची आहे. त्यामुळे महावितरणचे कर्मचारी वीज चोरीवर नेहमी लक्ष ठेवून राहतात. वीज चोरीला आळा घालण्यासाठी डिजिटल मीटर बसविले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक मीटर घराच्या बाहेर काढण्यात आला आहे. तरीही वीज चोरीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यास वीज विभागाला यश प्राप्त झाले नाही.गडचिरोली वीज मंडळात आलापल्ली, ब्रम्हपुरी व गडचिरोली या तीन विभागांचा समावेश होतो. वीज विभागाच्या कर्मचाºयांनी या तिन्ही विभागातील ६५४ नागरिकांच्या घरातील वीजचोरी पकडली आहे. या वीज चोरांनी ८५ लाख १९ हजार रूपयांची वीज चोरी केली आहे. ब्रम्हपुरी विभागात ३३५, गडचिरोली विभागातील १७६ तर आलापल्ली विभागातील १४२ वीज चोरींचे प्रकरणे उघडकीस आले आहेत.इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी प्रमाणगडचिरोली जिल्ह्यात वीज चोरीचे प्रमाण गोंदिया, चंद्रपूर आदी जिल्ह्यांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. इतर जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या सुमारास तारांवर आकडे टाकून सर्रास वीज चोरी केली जाते. जवळपासचे सर्वच नागरिक वीज चोरी करीत असल्याने याबाबतची तक्रार नागरिक करीत नाही. परिणामी वीज चोरी उघडकीस येत नाही. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीज चोरीचे प्रमाण कमी आहे.दुर्गम भागात काही प्रमाणात वीज चोरी होत असली तरी त्यांच्याकडे विद्युत उपकरणे कमी राहत असल्याने वीज चोरीचे प्रमाण कमी होते.वीज विभागातर्फे धडक मोहीमवीज चोºया पकडण्यासाठी वीज विभागामार्फत जिल्हाभरात अधूमधून धडक मोहीम राबविली जाते. या मोहिमेदरम्यान वीज चोरी आढळून येते. पहिलेच वसुलीचे प्रमाण कमी असल्याने त्यातही वीज चोरी वाढते. दरवर्षी होणारी वीज चोरी लक्षात घेऊन या वीज चोरीवर आळा घालण्यासाठी महावितरणतर्फे जास्त प्रमाणात धडक मोहिम राबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे यावर्षी जास्त कारवाया झाल्या.