शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

८५ ग्रामपंचायती केबलने जोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 01:45 IST

भारत नेट अभियानांतर्गत गावांमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

भारत नेट उपक्रम : लवकरच सुरू होणार इंटरनेट सेवा; गावांचा कायापालट होण्यास मदत गडचिरोली : भारत नेट अभियानांतर्गत गावांमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या योजनेंतर्गत पाच तालुक्यातील ८५ ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबर केबलने (ओएफसी) जोडण्यात आल्या आहेत. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी या गावांमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. केंद्र शासनाने विविध योजनांचा निधी सरळ ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात वळता करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्याचबरोबर देशातील प्रत्येक गाव इंटरनेटच्या जाळ्याने जोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी केंद्र शासनाने प्रत्येक ग्रामपंचायत इंटरनेटच्या माध्यमातून जोडण्यासाठी भारत नेट हा उपक्रम सुरू केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, मुलचेरा, कुरखेडा, चामोर्शी या तालुक्यांमध्ये काम सुरू करण्यात आले आहे. गडचिरोली तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीपैकी ९ ग्रामपंचायती आॅप्टीकल फायबरने जोडण्यात आल्या आहेत. देसाईगंज तालुक्यातील नऊ पैकी सात ग्रामपंचायती, मुलचेरा तालुक्यातील १७ पैकी चार ग्रामपंचायती, कुरखेडा तालुक्यातील ४५ पैकी २९ ग्रामपंचायती, चामोर्शी तालुक्यातील ७६ पैकी २४ ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबर केबलने जोडण्यात आले आहेत. ज्या ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबरने जोडल्या आहेत. तिथे ओएनटी ही एक मशीन लावण्यात येईल. त्याचबरोबर एक्सचेंज स्तरावर ओएलटी मशीन लावली जाणार आहे. या दोन्ही मशीन मार्चपूर्वी लावण्यात येईल. त्यामुळे या गावांमध्ये मार्चपूर्वी इंटरनेट सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास भारत संचार निगम लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. (नगर प्रतिनिधी) ज्या ग्रामपंचायतीमध्ये आॅप्टिकल फायबर पोहोचला आहे. त्या ठिकाणी ओएनटी व एक्सचेंज स्तरावर ओएलटी मशीन लावण्यात येतील. हे काम पुढील १५ ते २० दिवसांत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर या गावांमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यातील २४२ पैकी ज्या ग्रामपंचायतींचे काम शिल्लक राहिले आहे. तेथेही केबल टाकण्याचे काम वेगात सुरू आहे. मार्च महिन्यापूर्वी केबल टाकण्याचे काम पूर्ण होईल. - इलियासुद्दीन सय्यद, जिल्हा अभियंता, बीएसएनएल खासगी व्यक्तीलाही उपलब्ध होणार इंटरनेट सेवा आॅप्टिकल फायबर केबलची क्षमता १० जीबीपीएस एवढी आहे. तर ब्रॉडबँडची क्षमता केवळ दोन एमबीपीएस एवढी आहे. म्हणजेच आॅप्टिकल फायबर केबलची क्षमता ब्रॉडबँडच्या तुलनेत हजारो पटीने अधिक आहे. त्यामुळे संबंधित गावातील गावकरी, दुकानदार, शासकीय कार्यालये, संस्था यांना इंटरनेटची सुविधा बिनाअडथळा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ही गावे आता लवकरच आॅनलाईन होण्यास मदत होणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात विकासाची नांदी येणार आहे.