शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मेटॅडोरमधून नेत असलेली ८५ पेट्या दारू जप्त

By admin | Updated: September 25, 2016 01:40 IST

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देसाईगंजचे पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक मानकर यांनी

देसाईगंज पोलिसांची कारवाई : सिनेस्टाईलने केला पाठलागदेसाईगंज : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देसाईगंजचे पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक मानकर यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह देसाईगंज-आरमोरी मार्गावर सिनेस्टाईल पाठलाग करून कुरूड गावाजवळ मेटॅडोरसह १२ लाख ४० हजार रूपये किमतीची ८५ पेट्या देशी दारू शनिवारी पहाटेच्या सुमारास पकडली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दारू विक्रेत्या आरोपीचे नाव श्रावण वासुदेव दोरीवार (२७) रा. मूल असे आहे. चारचाकी मेटॅडोर वाहनाने भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथून देसाईगंज, आरमोरीकडे मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असल्याची माहिती देसाईगंजचे पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांना मिळाली. त्यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरिक्षक मानकर व सहकारी पोलिसांनी देसाईगंज, आरमोरी मार्गावर कुरूड गावाजवळ पाळत ठेवली. दरम्यान एमएच ३१-६६९५ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची मेटॅडोर येताना दिसली. सदर वाहन थांबविण्यासाठी चालकाला हात देऊन इशारा केला. मात्र चालकाने वाहन थांबविला नाही. त्यानंतर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून सदर मेटॅडोरला अडविले. मेटॅडोरमधील आरोपी श्रावण वासुदेव दोरीवार याला मार्गावर येण्याचे कारण विचारण्यात आले. त्यानंतर मेटॅडोरची तपासणी केली असता, सदर मेटॅडोर पूर्णत: रिकामे असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा मेटॅडोर ट्रालीची कसून तपासणी केली. यावेळी मेटॅडोर ट्रालीच्या आत कप्पे असल्याचे निदर्शनास आले. या कप्प्याची तपासणी केल्यावर त्यात देशी दारूच्या ९० एमएल मापाच्या ८५ पेट्या आढळून आल्या. आरोपी श्रावण दोरीवार याच्या विरोधात देसाईगंज पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)