शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

वडधम पार्कसाठी देणार ८४ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2017 01:37 IST

सिरोंचा तालुक्यातील वडधम येथे दोन वर्षांपूर्वी खोदकाम करताना डायनासोरचे जीवाश्म आढळून आले होते.

सोयीसुविधांची निर्मिती होणार : दोन वर्षांपूर्वी डायनासोरचे जीवाश्म आढळले लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील वडधम येथे दोन वर्षांपूर्वी खोदकाम करताना डायनासोरचे जीवाश्म आढळून आले होते. या जिवाश्मांच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने या स्थळाचा विकास करण्यासाठी शासनाने ८३ लाख ७५ हजार रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सिरोंचा तालुक्यातील वडधम गावाजवळ दोन वर्षांपूर्वी बगीचा तयार करण्यासाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमीन सपाटीकरणाचे काम करण्यात येत होते. दरम्यान या ठिकाणी डायनासोरचे जीवाश्म आढळून आले होते. यापूर्वी १९४७ मध्ये याच ठिकाणी खोदकाम करण्यात आले होते. त्यावेळीसुद्धा जिवाश्म आढळून आले होते. ते जिवाश्म कोलकाता येथील प्रयोगशाळेत ठेवण्यात आले आहेत. दोन वर्षांपूर्वी सापडलेले जिवाश्म वडधम येथेच ठेवण्यात आले आहेत. वडधम येथे जीवाश्म आढळल्यापासून या ठिकाणी भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वनपर्यटनासोबतच जीवाश्मांचा अभ्यास करण्यासाठी देशभरातून अनेक संशोधक या ठिकाणी येत आहेत. मात्र सिरोंचा तालुक्याच्या टोकावर असलेल्या वडधम येथे पर्यटकांसाठी कोणत्याच सोयीसुविधा नाही. त्यामुळे एक रात्रही या ठिकाणी थांबणे कठीण होते. जे जीवाश्म आढळून आले, त्यांची देखभाल योग्य पद्धतीने घेण्यात आली नाही तर ते ही नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या ठिकाणाचा विकास करण्याच्या उद्देशाने महसूल व वन विभागाने सुमारे ८३ लाख ७५ हजार रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सदर निधी उपलब्ध झाल्यास या ठिकाणी सोयीसुविधा होऊन पर्यटकांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा केली जात आहे. जाहिरातीच्या माध्यमातून या ठिकाणाचा प्रचार केला जाईल. या सुविधा निर्माण होणार वडधम येथील जीवाश्म पार्कसाठी शासनाने एकूण ८३ लाख ७५ हजार रूपयांचा निधी मंजूर केला आहे. यामधून जीवाश्म अवशेष, शिक्षण केंद्र निर्मितीसाठी ४० लाख रूपये खर्च केले जाणार आहेत. ५ लाखांच्या ५ फॉसिल रिपलिका, पाण्याची टाकी, पाईपलाईन, ३ वॉटर स्टँड निर्माण केले जाणार आहेत. रस्ता दुरूस्तीसाठी ४ लाख रूपये खर्च केले जातील. ३ रिटेनिंग व्हॉल्व, सोलरयुक्त बोअरवेल सिस्टीम, माहितीदर्शक सूचना फलक, प्रजातीनुसार रोपे, प्रसाधनगृह, सोलर लाईट, तिकीट घराची दुरूस्ती आदी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. जनजागृतीवर सुमारे २ लाख रूपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.