शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

८२० वीज खांब बदलणार

By admin | Updated: July 22, 2016 01:14 IST

मोडकळीस व जीर्ण झालेले जिल्हाभरातील सुमारे ८२० वीज खांब बदलविण्याचे नियोजन वीज विभागाने केले असून त्यापैकी आजपर्यंत १४३ खांब बदलविण्यात आले आहेत.

गडचिरोली : मोडकळीस व जीर्ण झालेले जिल्हाभरातील सुमारे ८२० वीज खांब बदलविण्याचे नियोजन वीज विभागाने केले असून त्यापैकी आजपर्यंत १४३ खांब बदलविण्यात आले आहेत. इतर खांब बदलविण्याची तयारी सुरू आहे. वीज खांब बदलविल्याने होणारा धोका काही प्रमाणात टळला असला तरी अजूनही हजारो खांब जीर्ण अवस्थेत ग्रामीण भागात दिसून येतात. सदर खांब बदलविण्याची तत्काळ कार्यवाही करणे आवश्यक झाले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या बहुतांश भागाला चंद्रपूर जिल्ह्यातून वीज पुरवठा केला जातो. वीज पुरवठा करण्याचे एकमेव माध्यम खांब व वीज तारा आहेत. गडचिरोली जिल्ह्याचा ग्रामीण भाग २० ते ३० वर्षांपूर्वी विद्युतने जोडण्यात आला आहे. काळाच्या ओघात लोखंडी खांब जमिनीजवळ गंजले आहेत. तर सिमेंट खांबांचीही कार्यक्षमता कमी झाल्याने तेही कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातून असे धोकादायक खांब बदलविण्याच्या हजारो तक्रारी वीज विभागाकडे प्राप्त होतात. वीज विभागाने अतिशय धोकादायक असलेले जिल्हाभरातील सुमारे ८२० खांब बदलविण्याचे नियोजन वीज विभागाने केले आहे. यामध्ये उच्चदाब वाहिनी व लघुदाब वाहिनीवरील खांबांचा समावेश आहे. गडचिरोली डिव्हीजनमध्ये येणाऱ्या गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, धानोरा, कुरखेडा, कोरची या सहा तालुक्यातील सुमारे १४३ खांब बदलविण्यात आले आहेत. तर आलापल्ली विभागाअंतर्गत येणाऱ्या चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, अहेरी या सहा तालुक्यातील केवळ दोनच खांब बदलविले असून ६६५ खांब बदलविणे शिल्लक आहेत. बहुतांश गावांमध्ये ३० ते ४० वर्षांपूर्वी वीज आली आहे. ३० ते ४० वर्षांत लोखंडी वीज खांब गंजून खालून त्याला ठिकठिकाणी छिद्र पडतात. त्यामुळे ते केव्हाही कोसळण्याची शक्यता राहते. परिणामी सदर खांब बदलविणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीच्या मार्फतीने तसेच सामान्य नागरिकही तालुकास्तरावरील वीज कंपनीच्या कार्यालयात याबाबत तक्रार दाखल करतात. तक्रारीची दखल घेऊन वीज खांब बदलविल्यास वीज कंपनीला १० हजारपेक्षा अधिक खांबांची गरज भासेल. मात्र वीज खांब उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत वीज विभाग सदर खांब बदलविण्यास टाळाटाळ करते. परिणामी आजही ग्रामीण भागात अशा प्रकारचे हजारो धोकादायक खांब दिसून येतात. सदर खांब बदलविणे अत्यंत आवश्यक झाले आहे. यासाठी वीज विभागने पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी) जंगल भागातून भूमिगत केबलने वीज पुरवठ्याची मागणी गडचिरोली जिल्ह्यातील ५० टक्के गावे दुर्गम भागात वसली आहेत. या गावांमध्ये वीज पुरवठा करण्यात आला आहे. वीज विभागाने कितीही नियोजन केले तरी पावसाळ्यादरम्यान एखादे झाड कोसळून वीज पुरवठा खंडित होतो. सदर वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यास १५ ते २० दिवस लागतात व तोपर्यंत सदर गाव किंवा परिसर अंधारातच राहतो. यावर एकमेव उपाय म्हणजे अशा गावांना फोनलाईनप्रमाणेच भूमीगत केबल टाकून वीज पुरवठा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र अजूनपर्यंततरी वीज विभागाने याबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे दुर्गम भागातील गावांचा वीज पुरवठा एमएसईबीने कितीने चांगले नियोजन केले तरी खंडित होणारच आहे. ४६३ किमीवरील फाद्यांची छाटणी गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश विद्युत लाईन जंगलातून गेली आहे. त्यामुळे दरवर्षी वीज तारेजवळ येणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडाव्या लागतात. ही गडचिरोली जिल्ह्यातील अतिशय गंभीर बाब आहे. झाडांच्या फांद्या न तोडल्यास त्या वीज तारांमध्ये शिरून स्पार्र्किंग होण्याचा धोका राहतो. त्याचबरोबर त्याच वीज तारांचा प्रवाह झाडाच्या बुंद्यापर्यंत आल्यास मानवाला वीज शॉक लागण्याचा धोका आहे किंवा वीज पुरवठा वेळोवेळी स्ट्रिपही होतो. त्यामुळे वीज विभागाच्या मार्फतीने पावसाळ्यापूर्वी दरवर्षी वीज तारेजवळील फांद्या तोडल्या जातात. यावर्षी सुमारे ४६३ किमीवरील फांद्या तोडल्या आहेत. यामध्ये गडचिरोली विभागातील १८३ किमीवरील ३३ केव्ही लाईनच्या जवळील फांद्या तोडल्या आहेत. ११ केव्ही लाईनजवळील २०० किमी अंतरावरील व लघु वाहिनीवरील ४० किमी अंतरावरील फांद्या तोडल्या आहेत. तर आलापल्ली विभागातील ४० किमीवरील फांद्या तोडल्या आहेत. ३७९ इन्सुलेटर बदलविले वीज तारावर असलेला प्रवाह वीज खांबापर्यंत पोहचू न देण्याचे महत्त्वाचे काम पीन इन्सुलेटर करत असते. त्यामुळे पीन इन्सुलेटर सुस्थितीत असणे अत्यंत आवश्यक आहे. वीज विभागाने एकूण ३७९ पीन इन्सुलेटर बदलविले आहेत. यामध्ये गडचिरोली विभागातील ३०४ व आलापल्ली विभागातील ७५ इन्सुलेटरचा समावेश आहे.