शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

८० टक्के नागरिकांकडे आधारकार्ड

By admin | Updated: August 30, 2014 01:29 IST

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत उपयोगी असलेला व सर्वसामान्य व्यक्तीची ओळख पटवून देणारा आधार कार्ड जिल्हातील सुमारे ८० टक्के...

गडचिरोली : शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत उपयोगी असलेला व सर्वसामान्य व्यक्तीची ओळख पटवून देणारा आधार कार्ड जिल्हातील सुमारे ८० टक्के नागरिकांकडे असून आधार कार्ड काढण्याची मोहीम जिल्हाभरात सुरूच असल्याने उर्वरित नागरिकांनाही येत्या काही महिन्यातच आधार कार्ड मिळण्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्याची २०११ च्या लोकसंख्येनुसार सुमारे १० लाख ७१ हजार ७९५ एवढी लोकसंख्या आहे. आधार कार्ड काढण्याची पहिली मोहीम तीन वर्षापूर्वी हाती घेण्यात आली होती. मात्र आधार कार्डच्या विश्वसनीयतेबाबत काही तज्ञांकडून आक्षेप घेण्यात आल्याने आधार कार्ड काढण्याची मोहीम जवळपास १ वर्ष थांबली होती. आधार कार्ड काढण्याच्या पहिल्या टप्प्यात जिल्हाभरातील २ लाख ३० हजार ३२४ नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात आले. त्यानंतर आधार कार्ड काढण्याची मोहीम थांबल्याने आधार कार्ड निरूपयोगी झाले असल्याचीही शंका नागरिकांमध्ये उपस्थित व्हायला लागली होती. आधार कार्डच्या विश्वसनीयतेबाबतच्या शंका दुर केल्यानंतर दुसरा टप्पा हाती घेण्यात आला. तेव्हापासून आधार कार्ड काढण्याची मोहीम सातत्याने सुरू आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने खासगी कंपन्या आधार कार्ड काढण्याचे कंत्राट घेण्यास तयार नव्हत्या. त्यामुळे शासनाने स्वत: किट उपलब्ध करून दिल्या. व त्यांच्या मार्फतीने आधार कार्ड काढण्याचे काम आता सुरू आहे. नक्षलग्रस्त भाग असल्याने आधार कार्ड काढण्याचे काम रोडावेल अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र असे घडले नाही. मात्र दुसऱ्या टप्प्यामध्ये सुमारे ६ लाख ११ हजार १६५ नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात आले आहेत. पहिला व दुसरा टप्पा असे मिळून सुमारे ८ लाख ४१ हजार ४८९ नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात आले आहेत. केवळ २० टक्के नागरिकांकडे आधार कार्ड नाहीत. आधार कार्ड काढण्याची मोहीम सुरूच असल्याने उर्वरित नागरिकांनाही काही दिवसांतच आधार कार्ड उपलब्ध होणार आहे. आधार कार्ड काढते वेळी संबंधित व्यक्तीचे फोटो काढून त्याच्या दोन्ही हातांच्या दहाही बोटांचे ठसे घेतले जातात. नेत्र पटलही स्कॅन करून त्याची माहिती केंद्रीयकृत डेटाबेसमध्ये साठविली जाते व त्याला बारा आकडे असलेला एक क्रमांक दिला जातो. हा क्रमांक म्हणजेच आधार कार्ड होय. संबंधित क्रमांक टाकल्यानंतर त्या व्यक्तीची ओळख पटविली जाते. हे या आधार कार्डचे विशेष आहे. महत्वाचे म्हणजे आधार कार्डवर जात, धर्म, पंथ, भौगोलिक स्थान याबाबतचा उल्लेख नाही. तो केवळ भारताचा नागरिक आहे. एवढीच त्याची ओळख आहे. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता कायम राहण्यास या आधार कार्डमुळे मदत होणार आहे. आधार कार्डचा उपयोग बँकेत खाते उघडतांना, वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी, गॅस सिलिंडर घेण्यासाठी, आश्रमशाळेतील प्रवेशासाठी यासारख्या असंख्य योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. (नगर प्रतिनिधी)