शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीसाठी ७२.७७ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 01:12 IST

जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतीमधील सात सदस्य व एका सरपंच पदासाठी रविवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत ७२.७७ टक्के सरासरी मतदान झाले आहे.

ठळक मुद्देआज मतमोजणी : सहा ग्रामपंचायतीत मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतीमधील सात सदस्य व एका सरपंच पदासाठी रविवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत ७२.७७ टक्के सरासरी मतदान झाले आहे.आरमोरी तालुक्यातील सिर्सी येथे दोन जागेसाठी मतदान घेण्यात आले. या दोन जागांसाठी एकूण १ हजार ५३४ मतदार होते. त्यापैकी १ हजार ४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी ६७.९९ टक्के एवढी आहे. गडचिरोली तालुक्यातील विहिरगाव येथे एका ग्रामपंचायत सदस्य पदाच्या जागेसाठी निवडणूक झाली. एकूण ४६१ मतदारांपैकी ३७३ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ८०.९१ टक्के एवढी आहे. चामोर्शी तालुक्यातील घोट येथील एक व चंदनखेडी येथील एका जागेसाठी मतदान झाले. घोट येथे एकूण ७१९ मतदारांपैकी ४७८ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ६६.४८ टक्के एवढी आहे. चंदनखेडी येथील एकूण २६७ मतदारांपैकी २५१ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ९४.०१ टक्के आहे. सिरोंचा तालुक्यातील कोर्ला माल येथे सरपंच व ग्रा.पं. सदस्य पदासाठी निवडणूक झाली. कोटापल्ली येथे सदस्य पदासाठी निवडणूक झाली. या दोन्ही जागेसाठी एकूण १ हजार १७२ मतदार होते. त्यापैकी ८ हजार ७७ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ७४.८३ टक्के एवढी आहे. सहाही ग्रामपंचायतीत एकूण ४ हजार १५३ मतदारांपैकी ३ हजार २२ मतदारांनी मतदान केले. आज मतमोजणी केली जाणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक