शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

७१ शेतकरी देणार विद्यापीठास जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:33 IST

स्थानिक गोंडवाना विद्यापीठाला २०० एकर जमिनीची आवश्यकता असली तरी १५० एकर जमीन मिळाल्यास विद्यापीठ विकासाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते.

ठळक मुद्देपुलखल व अडपल्ली परिसरात जागा : १३५ एकर खासगी जमिनीबाबतचे संमतीपत्र

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाला २०० एकर जमिनीची आवश्यकता असली तरी १५० एकर जमीन मिळाल्यास विद्यापीठ विकासाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. या संदर्भात विद्यापीठ प्रशासनाच्या आवाहनानुसार चर्चेअंती तब्बल १३५ एकर खासगी जमीन देण्यास पुलखल व अडपल्ली (गोगाव) येथील शेतकºयांनी अनुकूलता दाखविली असून या संदर्भात विद्यापीठ प्रशासनाला लेखी स्वरूपात संबंधित शेत जमीन मालकांचे संमतीपत्र प्राप्त झाले आहेत. सदर खासगी जमीन अधिग्रहित करण्यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने हालचाली वाढविल्या आहेत.चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी २ आॅक्टोबर २०११ रोजी स्थापन झालेल्या गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाशी एकूण २३८ महाविद्यालये गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित आहेत. विद्यापीठात प्रशस्त ग्रंथालय, शाखानिहाय अभ्यासक्रमांचे स्वतंत्र विभाग, वसतिगृह, प्रशासकीय भवन, कार्यालयीन विभाग, महाविद्यालय कॅम्पस व इतर सोयीसुविधा करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाला १५० एकर जागेची नितांत आवश्यकता आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून विद्यापीठाला जागा मिळण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने जिल्हा प्रशासनासह शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे. येथील शैक्षणिक विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने २०० एकर झुडपी जंगलाच्या जागेची वन विभागाकडे मागणी करून तसा प्रस्ताव सादर केला होता. मात्र हा प्रस्ताव वन विभागाने नामंजूर केला. त्यानंतर ही विद्यापीठाने इतर विभागाची शासकीय व खासगी जमीन शोधण्याचे काम युध्दपातळीवर सुरूच ठेवले. खासगी जमीन विकू इच्छिणाºया शेतकºयांनी विद्यापीठाला संमतीपत्र द्यावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले होते. त्यानुसार पुलखल येथील ५८ शेतकºयांनी १०० एकर जमीन विद्यापीठाला देण्याबाबतचे संमतीपत्र सादर केले आहे. याशिवाय अडपल्ली, गोगाव परिसरात जवळपास २४६ खासगी जमीन महामार्गालगत आहे. या भागातील १३ शेतकºयांनी आपली ३५ एकर जमीन देण्याबाबतचे संमतीपत्र विद्यापीठाला दिले आहे. या संदर्भात प्रशासनाची शेतकºयांशी चर्चाही झाली आहे.बाजारभावाच्या चारपट मिळेल जमिनीचा मोबदलागोंडवाना विद्यापीठ प्रशासनाला आवश्यक असणारी जागा देण्यास शेतकºयांच्या बैठकींमध्ये बराच खल झाला. यात शेतकºयांनी जमिनीच्या किमतीची मागणी केली. त्यानुसार जमीन देण्यास शेतकºयांनी सहमती दर्शविली. जमीन देण्याबाबतचे संमतीपत्र देणाºया संबंधित जमीन मालकाला भूमिअधिग्रहणाच्या नियमानुसार बाजार भावाच्या चारपट किंमत संबंधित खासगी जमिनीला विद्यापीठ प्रशासना अंतर्गत शासनाकडून मिळणार आहे. जमीन खरेदीसाठी विद्यापीठ प्रशासन शासनाकडे मागणी करणार आहे.२० हेक्टर आर शासकीय जमिनीचे प्रस्ताव सादरगोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने गडचिरोली शहराच्या परिसरात मोकळ्या स्वरूपात असलेल्या शासकीय जमिनीचा शोध घेतला. शासकीय जमीन रिकामी असल्याबाबतची खात्री झाल्यानंतर सदर जमीन विद्यापीठाला मिळावी या संदर्भातची मागणी विद्यापीठ प्रशासनाने जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे केली आहे.पुलखल कनेरी येथील १२.५६ हेक्टर आर व पुलखल येथील ७.८६ हेक्टर आर अशी एकूण २०.४२ हेक्टर आर शासकीय जमीन विद्यापीठाला उपलब्ध करून देण्यात यावी, याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आला आहे. या संदर्भात कुलगुरू व कुलसचिवांकडून जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आहे.