शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

वनौषधीच्या उपयोगीतेवर ७० वैदूंचे विचारमंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 01:14 IST

आरोग्य प्रबोधिनीद्वारे तिसरे गोंडवाना वैदू साहित्य संमेलन देसाईगंज येथील सिंधू भवनात २३ व २४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यातील ७० वैदूंनी सहभाग घेऊन डोंगरदऱ्यात व खेड्यापाड्यात असलेल्या औषधी वनस्पतींची माहिती दिली.

ठळक मुद्देदेसाईगंज येथे वैदू संमेलन : आधुनिक युगातही औषधी वनस्पतींचे महत्त्व अबाधित

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : आरोग्य प्रबोधिनीद्वारे तिसरे गोंडवाना वैदू साहित्य संमेलन देसाईगंज येथील सिंधू भवनात २३ व २४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यातील ७० वैदूंनी सहभाग घेऊन डोंगरदऱ्यात व खेड्यापाड्यात असलेल्या औषधी वनस्पतींची माहिती दिली.संमेलनाचे उद्घाटन आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते वटवृक्षाच्या रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देसाईगंज वन विभागाचे उपवनसंरक्षक अ.वि. विवरेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून वैदू जयपाल ढवळे, नामदेव कुसराम होते. दोन दिवस चाललेल्या या संमेलनात दुर्मिळ औषधी वनस्पतींचे संवर्धन या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. आयुर्वेदिक औषध कंपन्यांचे स्टॉल लावण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार कृष्णा गजबे यांनी वृध्द कलावंतांच्या धरतीवर वृध्द वैदूंना मानधन देण्यासाठी शासनाकडे आपण पाठपुरावा करू. सर्व वैदूंनी आरोग्य प्रबोधिनीच्या माध्यमातून निवेदन तयार करावे. शासन दरबारी वैदूंच्या मागण्या मांडू, असे आश्वासन दिले. अध्यक्षीय स्थानावरून बोलताना उपवनसंरक्षक विवरेकर म्हणाले, पारंपारिक वैदूंची भूमिका प्रकृती स्वास्थासाठी फार महत्त्वाची आहे. ग्रामीण आदिवासी भागातील नागरिकांना डॉक्टरपेक्षाही वैदू जवळचा वाटतो. याचे कारण म्हणजे, वैदू हा सुखदु:खाशी एकरूप असतो. औषधी घेताना आहार, आरोग्य, पथ्य या संबंधी वैदूची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बदलत्या काळात वैदूंनी नुसतेच जंगलावर निर्भर राहण्यापेक्षा वनौषधींची लागवड आपल्या परिसरात तसेच घरासभोवताल करावी, यातून उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होईल. नागरिकांनाही उपचार मिळण्यास मदत होईल. वैदूंच्या खुल्या सत्रात वैदूंनी बदलत्या काळात औषधोपचार करताना येणारे अनुभव व आव्हाने यावर मत व्यक्त केले. विष्णू दुनेदार यांनी जैव विविधता संवर्धनात वैदूंच्या योगदानाविषयी माहिती दिली. प्रास्ताविक डॉ. सूर्यप्रकाश गभने, संचालन व्ही. दुनेदार, तर आभार अर्चना गभने यांनी मानले. यशस्वीतेसाठी आरती पुराम, अल्का कुबडे, जितेंद्र सुकारे, वैभव बुराडे, मनिष वझाडे, राधेश्याम मारबते यांनी सहकार्य केले.औषधी वनस्पतींचे संगोपन गरजेचेगडचिरोली जिल्ह्यातील जंगलात मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती उपलब्ध आहेत. या औषधी वनस्पतींचे महत्त्व ग्रामीण व दुर्गम भागातील वैदूंनाच माहित आहे. त्यांच्याकडील ज्ञान पिढ्यानपिढ्या चालत आले आहे. मात्र आधुनिक वैद्यकशास्त्रातील संशोधनाचा फार मोठा फटका वैदू व औषधी वनस्पतीला बसला आहे. मेडिकल मध्ये मिळणारी औषधी ही रासायनिक द्रव्यांपासून बनली राहते. या औषधीमुळे रोग जरी लवकर बरा होत असला तरी त्याचे काही दुष्परिणामही आहेत. मात्र वनस्पती औषधीचे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाही. आयुर्वैदामध्ये औषधी वनस्पतींचे महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे औषधी वनस्पतींचे संगोपन ही काळाची गरज असल्याची प्रतिक्रिया उपस्थित वैदूंनी व्यक्त केली.

टॅग्स :medicineऔषधं