शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

७ लाख २ हजार रूपयांचा दंड वसूल

By admin | Updated: February 16, 2017 01:52 IST

तालुक्यातील दोन रेतीघावर धाड टाकून उच्च अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या वाहनाविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे.

रेती तस्करीचे प्रकरण : दोन कंत्राटदारांविरुद्ध कारवाई सिरोंचा : तालुक्यातील दोन रेतीघावर धाड टाकून उच्च अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या वाहनाविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. संबंधित रेती कंत्राटदारावर दंड आकारून यातील दोघांकडून एकूण ७ लाख २ हजार रूपये वसुलीचा आकडा निश्चित झाला आहे. यात नगरम घाट २ च्या कंत्राटदाराकडून २ लाख ९७ हजार तर वडधमच्या कंत्राटदाराकडून ४ लाख ५ हजार रूपये दंड महसूल विभागाला अपेक्षित आहे. नगरमच्या रेतीने भरलेल्या ११ वाहने तसेच वडधमच्या रेतीने भरलेल्या १६ वाहनांवर ही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय नगरम २ च्या ३ व वडधमच्या १ एक्झॉव्हेटरवर पुढील कारवाई करण्याचा निर्णय उपविभागीय अधिकारी (राजस्व) यांच्या विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले. तसेच नगरमच्या ३० व वडधमच्या १२ अशा एकूण ४२ वाहनाविरूद्ध पुढील कारवाई सुद्ध उच्च अधिकाऱ्यांकडे निर्णयाधीन आहे. वडधम रेती घाटाचे कंत्राटदार इनगंटी व्यंकटेश्वर हे असून त्यांची व्यंकटेश बोअरवेल ही खासगी कंपनी आहे. सदर रेतीघाट गोदावरी नदीत असून या क्षेत्राचा भूमापन क्र. ७७ च्या पश्चिमेस आहे. यातील ४ हेक्टर ९५ आर जागेतून ५२ हजार ४७३ ब्रास रेतीची उचल करणे अपेक्षित आहे. या घाटाची अंतिम अपसेट किंमत २ कोटी ९८ लाख ९ हजार ५०० रूपये आहे. याशिवाय अंकिसा, मालगुजारी व मुक्कीडगुट्टा घाटाचे कंत्राटही व्यंकटेश्वरच्याच नावे आहेत. अंकिसा घाट पेंटिपाका राजस्व निरीक्षक मंडळ तर मुक्कीडगुट्टा घाट आसरअल्ली मंडळाअंतर्गत समाविष्ट आहे.