शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

६७ दिव्यांगांना अर्थसाहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 22:50 IST

राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या निर्णयानुसार अपंगांसाठी राखून ठेवावयाच्या तीन टक्के निधी मधून स्थानिक पालिका प्रशासनाच्या वतीने न.प. क्षेत्रातील ६७ लाभार्थ्यांना त्यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणानुसार अर्थसहाय्य खासदार अशोक नेते यांच्या हस्ते देण्यात आले.

ठळक मुद्देखासदारांची उपस्थिती : तीन टक्के राखीव निधीतून लाभार्थ्यांना दिला लाभ

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या निर्णयानुसार अपंगांसाठी राखून ठेवावयाच्या तीन टक्के निधी मधून स्थानिक पालिका प्रशासनाच्या वतीने न.प. क्षेत्रातील ६७ लाभार्थ्यांना त्यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणानुसार अर्थसहाय्य खासदार अशोक नेते यांच्या हस्ते देण्यात आले.याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक चौधरी, नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पाणी पुरवठा सभापती प्रविण वाघरे, वित्त व नियोजन सभापती संजय मेश्राम, शिक्षण सभापती अनिता विश्रोजवार, नगरसेवक सतीश विधाते, अल्का पोहणकर, लता लाटकर, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, गुलाब मडावी, वैष्णवी नैताम, निता उंदीरवाडे, पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने, भाजपचे पदाधिकारी रवींद्र ओल्लालवार, डॉ. भारत खटी आदी मान्यवर उपस्थित होते.नगर विकास विभागाच्या २८ आॅक्टोबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार अपंग व्यक्तींसाठी समान संधी, संरक्षण व समान सहभाग कायदा १९९५ चे कलम ४० नुसार नगर परिषद प्रशासन तीन टक्के निधी अपंगाच्या कल्याणासाठी राखून ठेवते. त्यानुसार दरवर्षी न.प. क्षेत्रातील अपंग लाभार्थ्यांना अर्थसहाय्य दिले जाते. अपंगांना दिलासा मिळावा, यासाठी ही विशेष तरतूद आहे. धनादेश वाटप कार्यक्रमाला पालिकेचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.अपंगांसाठी विशेष कार्यक्रम घेणार-नेतेयाप्रसंगी मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते म्हणाले, अपंगांना अपंग म्हणू नये. त्यांना दिव्यांग असे संबोधावे ही संकल्पना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम मांडली. त्यानुसार विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या वतीने अपंगांसाठी अनेक कार्यक्रम घेऊन त्यांच्यासाठीच्या योजनांची जनजागृती करण्यात आली. आपणही अपंगांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी कटिबध्द असून यापुढे जिल्ह्यातील अपंगांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करणार, अशी ग्वाही खासदार नेते यांनी यावेळी दिली. याप्रसंगी नगराध्यक्ष योगीता पिपरे, मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनीही अपंगांच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. अपंगांसाठी पालिका प्रशासनाने नियोजित कार्यक्रम राबवावा, असे मान्यवरांनी आवाहन केले.