शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
3
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
4
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
5
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
6
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
7
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
8
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
9
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
10
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
11
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
12
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
13
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
14
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
15
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
16
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
17
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
18
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
19
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
20
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला

जिल्हा सामान्य रूग्णालयात अधिपरिचारीकांची ६४ पदे रिक्त

By admin | Updated: July 21, 2016 01:23 IST

राज्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात अधिपरिचारीका संवर्गातील ६४ पदे रिक्त आहेत.

गडचिरोली : राज्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात अधिपरिचारीका संवर्गातील ६४ पदे रिक्त आहेत. ही पदे तत्काळ भरण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस संघटनेने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे केली आहे. नर्सेस संघटनेने म्हटले आहे की, १९९२ मध्ये गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रूग्णालय स्थापन करण्यात आले. २२६ खाटांची सुविधा येथे असून या रूग्णालयात आंध्रप्रदेश, तेलंगणा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यासह सीमावर्ती भागातले मोठ्या प्रमाणावर रूग्ण दाखल होतात. सद्य:स्थितीत २२६ बेडची सुविधा अत्यंत अपुरी पडत असून येथे दररोज ५०० ते ६०० रूग्ण भरती असतात. बेड क्षमतेपेक्षा जास्त रूग्ण भरती असल्यामुळे रूग्णांना फरशीवर गादी देऊन ठेवण्याची पाळी आस्थापनेवर येत आहे. यामुळे रूग्णांवर सर्वतोपरी उपचारही करण्यात अडचणी येतात. २२६ खाटांच्या या रूग्णालयात अधिपरिचारीका संवर्गातील अधिसेविकेचे एक पद, सहायक अधिसेविकचे एक पद, सिस्टर ट्युटरचे पाच पद, परिसेविकेचे १८ पैकी १३ पद, सार्वजनिक आरोग्य परिचारिकेचे एक पद, मनोविकृती परिचारिकेचे तीन पद व अधिपरिचारिकांचे ९५ पैकी ४० पद रिक्त आहेत. रूग्णांची संख्या पाहता अधिपरिचारिका संवर्गातील काही अधिपरिचारिका वेगवेगळ्या विभागात प्रभारी परिसेविका म्हणून काम करीत आहेत. एका पाळीमध्ये एक परिचारिका ६० ते ८० रूग्णांना बघते. फक्त नाईट आॅफ घेऊन सेवारत राहत असल्याने अधिपरिचारीकाही आजारी पडल्यास या ठिकाणी दुसरी अधिपरिचारीका नसल्याने त्यांना अधिकची सेवा द्यावी लागते. सततच्या कामाच्या ताणामुळे मानसिक संतुलन ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या कुटुंबालाही या अधिपरिचारीका योग्य न्याय देऊ शकत नाही, असेही संघटनेच्या वतीने नमूद करण्यात आले आहे. तेव्हा रूग्णालयात खाटांची संख्या वाढवून त्या प्रमाणात मनुष्यबळ वाढवावे व रिक्त असलेल्या अधिपरिचारीका संवर्गातील पदे त्वरीत भरण्यात यावे, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)