शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

पाच वर्षात ६३७ नागरिकांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2016 01:21 IST

गडचिरोली जिल्ह्यात २०११ ते २०१५ या पाच वर्षात सुमारे १ हजार १०३ अपघात घडले असून या अपघातांमध्ये ६३७ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.

१ हजार १०३ अपघात : गडचिरोली जिल्ह्यात १ हजार ६४४ नागरिक जखमीगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात २०११ ते २०१५ या पाच वर्षात सुमारे १ हजार १०३ अपघात घडले असून या अपघातांमध्ये ६३७ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तर १ हजार ६४४ नागरिक जखमी झाले आहेत. आर्थिक विकासाबरोबरच दिवसेंदिवस प्रवासी तसेच माल वाहतुकीच्या वाहनांची संख्या वाढत चालली आहे. मागील पाच वर्षात दुचाकी व चारचाकी या प्रवासी वाहनांमध्ये तीन पटीने वाढ झाली आहे. वाहने वाढली असली तरी त्या प्रमाणात रस्त्यांचे रूंदीकरण झाले नाही. काही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले राहतात. रहदारीस सदर मार्ग योग्य नसतानाही त्यावरून दरदिवशी हजारो वाहने ये-जा करतात. या सर्वांचा परिणाम म्हणजे अपघातांमध्ये वाढ होत चालली आहे. परिवहन विभागाने वाहतुकीचे नियम ठरवून दिले असले तरी काही वाहनचालक या नियमांचे पालन करीत नाही. त्यामुळेही अपघातांमध्ये वाढ होत चालली आहे. गडचिरोली जिल्ह्यात २०११ मध्ये एकूण २२२ अपघात घडले होते. त्यामध्ये १०९ नागरिक मृत्यूमुखी पडले. तर ३५४ नागरिक जखमी झाले. २०१२ मध्ये २७२ अपघातांमध्ये १७४ नागरिकांचा मृत्यू झाला. तर २८९ नागरिक जखमी झाले. २०१३ मध्ये २२४ अपघातांमध्ये ११४ नागरिकांचा मृत्यू तर ४०४ नागरिक जखमी झाले. २०१४ मध्ये १९९ अपघात घडले. यामध्ये १२५ नागरिकांचा मृत्यू तर ३३२ नागरिक जखमी झाले. २०१५ मध्ये १८६ अपघातांमध्ये ११५ नागरिक मृत्यूमुखी पडले तर २६५ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला एका तासाच्या आत किमान प्राथमिक उपचार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. या एका तासाचे महत्त्व लक्षात घेऊन वैद्यकीय क्षेत्रामध्ये या कालावधीला ‘गोल्डन अवर’ असे संबोधल्या जाते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, धानोरा या तालुक्यांमध्ये ३० ते ४० किमी अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला वेळेवर दवाखान्यात भरती करण्यासाठी वाहनसुद्धा मिळत नाही. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण कमी असले तरी मृतकांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)