शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

६२ ग्रा.पं. सदस्य अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:24 IST

ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत सुमारे ६२ प्रभागांमध्ये केवळ एकाच उमेदवाराने नामांकन सादर केल्याने या प्रभागातील उमेदवार अविरोध निवडून आले आहेत.

ठळक मुद्देअल्प प्रतिसाद : भामरागड तालुक्यातील सर्वच उमेदवार बिनविरोध

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत सुमारे ६२ प्रभागांमध्ये केवळ एकाच उमेदवाराने नामांकन सादर केल्याने या प्रभागातील उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. १० तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीमध्ये २४ जागांसाठी पोटनिवडणूक घेतली जाणार आहे.निवडणूक विभागाने १६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा व २०७ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पोटनिवडणूक जाहीर झालेल्या बहुतांश ग्रामपंचायती धानोरा, अहेरी, भामरागड, सिरोंचा या तालुक्यातील आहेत. नक्षल्यांचा नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना ग्रामपंचायत सदस्य न बनण्याची धमकी देतात. त्यामुळे बहुतांश नागरिक इच्छा असूनही ग्रामपंचायतीचे नामांकन भरत नाही. काही गावांमध्ये ज्या प्रवर्गासाठी जागा आहे. त्या प्रवर्गाचे नागरिकच नाही. त्यामुळे सदर गावात त्या प्रवर्गाचा उमेदवार मिळत नाही. या सर्व कारणांमुळे ग्रामपंचायतीच्या जागा रिक्त राहतात. प्रशासनाला या ग्रामपंचायतीमध्ये वेळोवेळी निवडणूक घेण्याची नामुश्की ओढवते.यावेळी सुध्दा अत्यंत कमी प्रमाणात नामांकन दाखल झाले. पोटनिवडणूक असलेल्या २०२ जागांवर नामांकनच भरण्यात आले नाही. त्यामुळे या जागा आता रिक्त राहणार आहेत. ६२ जागांसाठी केवळ एकच उमेदवाराने नामांकन भरला. त्यामुळे सदर उमेदवारांना अविरोध घोषीत करण्यात आले आहे.तालुकानिहाय अविरोध उमेदवारअविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये देसाईगंज तालुक्यातील बोडधा व सावंगी येथील उमेदवार, आरमोरी तालुक्यातील वडधा, वघाळा व नरचुली येथील उमेदवार, धानोरा तालुक्यातील जांभळी, सुरसुंडी, चिंगली, मोहली, येरकड येथील उमेदवारांचा समावेश आहे. मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली, एटापल्ली तालुक्यातील जारावंडी, कांदोळी, गट्टा, कसनसूर, नागुलवाही, पुरसलगोंदी, जांभीया, चोखेवाडा, कोहका, तोडसा, सिरोंचा तालुक्यातील अंकिसा माल, गुलमकोडा, कोपेला, बेजुरपल्ली, तुमनूर, भामरागड तालुक्यातील इरकडुमे, पल्ले, मन्नेराजाराम या ग्रामपंचायतीमधील प्रभागांचा समावेश आहे.सार्वत्रिक निवडणूक असलेल्या काही प्रभागांमध्ये सुध्दा सदस्य अविरोध निवडून आले आहेत.५३ प्रभांगांमध्ये होणार निवडणूकसहा तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीमधील २९ प्रभागांमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. तर १० तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीमध्ये एकूण २४ प्रभागांसाठी पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. निवडणुकीसाठी केवळ आता सात दिवस शिल्लक असल्याने निवडणूक व पोलीस विभाग कामाला लागला आहे.