शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

सौभाग्य योजनेतून ६१० घरकूल उजाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:29 IST

प्रत्येक घराला वीज जोडणी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने केंद्र शासनाने सौभाग्य योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ६१० वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देमोफत वीज पुरवठा : आलापल्ली विभागातील ५०९ तर गडचिरोली विभागातील १०१ घरांना वीज जोडणी

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : प्रत्येक घराला वीज जोडणी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने केंद्र शासनाने सौभाग्य योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ६१० वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. आजपर्यंत अंधारात जीवन कंठीत असलेल्या नागरिकांच्या घरात पहिल्यांदाच विजेचा प्रकाश पडला आहे.गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील जवळपास २०० गावे विजेपासून वंचित होती. कोणत्याही परिस्थितीत या गावांना वीज पुरवठा करावा, असे निर्देश राज्य शासनाने दिल्यानंतर वीज वितरण कंपनीने प्रयत्नांची पराकाष्टा करीत जवळपास १५० गावांमध्ये वीज पुरवठा केला आहे. वीज पुरवठा झाला असला तरी आर्थिक परिस्थितीमुळे बहुतांश नागरिक वीज जोडणी घेण्यास तयार नव्हते. अशा नागरिकांना केंद्र शासनाच्या सौभाग्य योजनेंतर्गत वीज जोडणी करून दिली जात आहे. या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना मोफत वीज जोडणी करून दिली जात आहे. तर इतर लाभार्थ्यांना ५०० रूपये शुल्क आकारण्यात येत आहे. ५०० रूपये शुल्क लाभार्थ्यांनी त्याच्या बिलातून १० टप्प्यात भरायचे आहे. मोफत वीज जोडणीसाठी लाभार्थी कुटुंबाची पात्रता २०११ च्या सामाजिक, आर्थिक जात गणनेच्या आधारे करण्यात येणार आहे. योजनेत वीज पुरवठा प्राप्त झालेल्या ग्राहकांना मासिक वीज बील भरणे बंधनकारक आहे. थकबाकीमुळे कायमचा पुरवठा खंडीत झालेले घर किंवा तात्पुरत्या शिबिरात स्थलांतरीत होणारी घरे किंवा शेतातील घरे या योजनेस पात्र ठरणार नाही.सौभाग्य योजनेंतर्गत आलापल्ली विभागातील ५०९, गडचिरोली विभागातील १०१ असे एकूण ६१० कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आली आहे. वीज जोडणी झालेले बहुतांश लाभार्थी एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, अहेरी व धानोरा या तालुक्यातील आहेत. सौभाग्य योजनेंतर्गत महाराष्टÑात ११ लाख ६४ हजार १३५ लाभार्थ्यांना वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यातील ७ लाख ६७ हजार ९३९ लाभार्थ्यांना पारंपरिक पध्दतीने तर २१ हजार ५६ लाभार्थ्यांना अपारंपरिक पध्दतीने वीज पुरवठा करण्यात येणार आहे. दारिद्र्य रेषेखालील घरे तसेच पूर्वी मंजूर झालेल्या पंडीत दिन दयाल ग्रामज्योती योजनेंतर्गत राज्यातील ३ लाख ९६ हजार १९६ घरांना वीज जोडणी देण्याचे काम सुरू आहे.गडचिरोली जिल्ह्यात वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता दीपक घुगल, गडचिरोली मंडळाचे अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के, गडचिरोली विभागाचे कार्यकारी अभियंता विजय मेश्राम व आलापल्ली विभागाचे कार्यकारी अभियंता अमित परांजपे यांच्या मार्गदर्शनात जास्तीत जास्त गावांना वीज पुरवठा व जास्तीत जास्त नागरिकांना वीज जोडण्या देण्याचे प्रयत्न सुरू असल्याने १५० पेक्षा अधिक गावांना वीज पुरवठा झाला आहे.दुर्गम भागातील गावांना प्राधान्यसौभाग्य योजनेंतर्गत आलापल्ली विभागात येणाऱ्या पालेकसा, गटेपल्ली, रूमालकसा, कोकामेटाटोला, उमरगट्टा, कोठागोडा, झुरी, करमटोला, कांडला, सिडामटाला, कोठारी, गुरेटोला, रायपेटा, कोरलामाल, कोरलाचेक, किष्टय्यापल्ली, रमेश गुडम, करजेली, एकराखुर्द, येनकामडा, उमानूर, मारपल्ली, बसवापूर, रायपल्ली, जिमलगट्टा, येरमनार या गावांचा समावेश आहे. तर धानोरा तालुक्यातील बंदूर, धुरमूडटोला, सोनपूर, रानकट्टा, मार्जिनटोला, तारामटोला, मगदंड, सावरगाव, पन्नेमारा, उमरपाल टोला, आरमुरकस, सालईटोला या गावांचा समावेश आहे. ज्या गावात वीज पुरवठा करणे शक्य नाही, अशा गावांना सौरऊर्जा संच दिले जात आहे.