शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

जिल्ह्यात घरकुलावर ६०.८५ टक्के निधी खर्च

By admin | Updated: March 22, 2015 00:18 IST

इंदिरा आवास योजनेंतर्गत सन २०१४-१५ या वर्षात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला सात हजार ७९४ घरकुलाचे उद्दीष्ट होते.

गडचिरोली : इंदिरा आवास योजनेंतर्गत सन २०१४-१५ या वर्षात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला सात हजार ७९४ घरकुलाचे उद्दीष्ट होते. तेवढेच घरकूल मंजूर करण्यात आले. आतापर्यंत ७ हजार ७९४ पैकी ७ हजार ७६१ लाभार्थ्यांनी घरकूल बांधकाम सुरू केले. या घरकूल लाभार्थ्याला २६ कोटी ६८ लाख ४४ हजार रूपयांचे अनुदान पहिल्या हप्त्यात वितरित करण्यात आले. याची टक्केवारी ९२.५३ टक्के आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने आतापर्यंत घरकुलांवर ६०.८५ टक्के निधी खर्च केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दारिद्र्य रेषेखालील गरीब नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनाने इंदिरा आवास योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नियंत्रणाखाली पंचायत समितीमार्फत घरकुलाचे बांधकाम करण्यात येते. मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम सुरू केल्यानंतर व तशी माहिती दिल्यानंतर पहिल्या हप्त्याचे अनुदान संबंधित लाभार्थ्यांना अदा केले जाते. अहेरी तालुक्यातील मंजूर १ हजार ४२५ लाभार्थ्यांपैकी १ हजार १७० लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याची १ हजार ५१ लक्ष रूपये वितरित करण्यात आले आहे. आरमोरी तालुक्यातील ४५५ लाभार्थ्यांना ४५१ लक्ष रूपये वितरित करण्यात आले. भामरागड तालुक्यातील ५७९ लाभार्थ्यांना ५६२ लक्ष रूपये तर चामोर्शी तालुक्यातील ५७३ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे ५३९ लक्ष रूपये वितरित करण्यात आले. देसाईगंज तालुक्यातील ९२ लाभार्थ्यांना ९२ लक्ष रूपये तर धानोरा तालुक्यातील ९६१ लाभार्थ्यांना ९६१ लक्ष रूपये वितरित करण्यात आले. एटापल्ली तालुक्यातील ५३९ लाभार्थ्यांना ५२३ लक्ष रूपये वितरित करण्यात आले. गडचिरोली तालुक्यातील लाभार्थ्यांना एकूण ४५२ लक्ष, कोरची तालुक्यातील लाभार्थ्यांना एकूण ६९२, कुरखेडा तालुक्यातील लाभार्थ्यांना ९०८ लक्ष रूपये, मुलचेरा तालुक्यातील लाभार्थ्यांना ३१७ लक्ष रूपये व सिरोंचा तालुक्यातील लाभार्थ्यांना ६६४ रूपयाचे अनुदान पहिल्या हप्त्यात वितरित करण्यात आल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील ७ हजार ७९४ लाभार्थ्यांपैकी ७ हजार ७६१ लाभार्थ्यांच्या घरकुलावर आतापर्यंत एकूण २६ कोटी ६८ लाख ४४ हजार रूपये खर्च झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. इंदिरा आवास योजनेंतर्गत वितरित करण्यात आलेल्या पहिल्या हप्त्यातील निधीची अहेरी तालुक्यातील टक्केवारी ५३.७५ आहे. आरमोरी तालुक्यातील अनुदान वितरणाची टक्केवारी ९९.३४ आहे. भामरागड तालुक्यातील अनुदान वितरणाची टक्केवारी ९३.०५ आहे. चामोर्शी तालुक्यातील अनुदान वितरणाची टक्केवारी ८४.७५ आहे. देसाईगंज तालुक्यात पहिल्या हप्त्याचे अनुदान १०० टक्के वितरित करण्यात आले आहे. धानोरा तालुक्यातील अनुदान वितरणाची टक्केवारी ९८.६७ तर एटापल्ली तालुक्याची टक्केवारी ९७.५७ आहे. १३ कोटी ३१ लाख निधीची प्रतीक्षाइंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुलांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनुसूचित जमाती उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजनेच्या लेखाशिर्षाखाली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला निधी मिळत असतो. जिल्हाभरात सध्या घरकुलाचे काम जोमात सुरू आहे. तर काही घरकुलांचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. टीएसपीचे १० कोटी ८४ लाख व एससीपीचे १ कोटी २७ लाख असे एकूण १२ कोटी ११ लाख व इतर १३ कोटी ३१ लाखांच्या निधीची प्रतीक्षा आहे.