शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत तेंदू कंत्राटदाराने बुडवली ग्रामसभांची ६ कोटींची रॉयल्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 15:19 IST

गडचिरोली जिल्ह्यातील पेसाअंतर्गत ५ ग्रामसभांच्या तेंदूपत्त्याची उलच केल्यानंतर रॉयल्टीची ६ कोटींची रक्कम गोंदिया येथील एका तेंदू कंत्राटदाराने बुडविल्याचा आरोप ग्रामसभांनी केला आहे.

ठळक मुद्देमालवाहतूक थांबविण्यासाठी साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील पेसाअंतर्गत ५ ग्रामसभांच्या तेंदूपत्त्याची उलच केल्यानंतर रॉयल्टीची ६ कोटींची रक्कम गोंदिया येथील एका तेंदू कंत्राटदाराने बुडविल्याचा आरोप ग्रामसभांनी केला आहे. विशेष म्हणजे सदर कंत्राटदार वेगवेगळ्या नावाने तेंदूचे कंत्राट घेऊन गडचिरोली जिल्ह्यात आपला व्यवसाय करत आहे. त्यामुळे सदर कंत्राटदाराने जुनी रॉयल्टीची रक्कम दिल्याशिवाय त्यांना नवीन माल वाहतुकीची परवानगी देऊ नये, असे साकडे ग्रामसभांनी प्रशासनाला घातले आहे.स्रेहल बिपीनभाई पटेल रा.गोंदिया असे सदर तेंदू कंत्राटदाराचे नाव आहे. या कंत्राटदाराने तेंदूपत्ता हंगाम २०१७ मध्ये ट्रेडिंग स्रेहल कंपनी आणि किशोरीलाल अ‍ॅन्ड कंपनी या नावाने एटापल्ली तालुक्यातील सुरजागड इलाक्यामधील गट्टा, गर्देवाडा, वांगेतुरी, जांबिया आणि जबेली या ग्रामसभांसोबत तेंदूपत्ता संकलनासाठी करार केला होता. त्यानुसार गट्टा, जांबिया व गर्देवाडा या तेंदू युनिटसाठी प्रति स्टँडर्ड बॅग १६ हजार तर वांगेतुरी व जबेली युनिटसाठी १४ हजार असा दर निश्चित करून करारनामा केला होता. सदर माल आपल्या गोदामात साठवल्यानंतर कंत्राटदाराने रॉयल्टीची प्रथम हप्त्याची रक्कम ग्रामसभांच्या खात्यात जमा केली. त्यानुसार ग्रामसभांनी टीपी ३ करिता नाहरकत प्रमाणपत्र देऊन वनविभाग भामरागड यांच्याकडून टीपी ३ मिळवून दिली आणि तेवढ्या मालाची विक्रीही झाली होती. मात्र त्यानंतर रॉयल्टीची कोणतीही रक्कम न देता कंत्राटदाराने मालाची परस्पर विक्री केल्याचा आरोप ग्रामसभांनी केला आहे.आजच्या स्थितीत सदर कंत्राटदाराकडे रॉयल्टीपोटी गट्टा ग्रामपंचायतचे १.५६ कोटी, जांबियाचे १.१५ कोटी, गर्देवाडाचे १.१३ कोटी, वंगेतुरीचे १.२९ कोटी आणि जवेलीचे १.२५ कोटी असे एकूण ६ कोटी ४० लाख रुपये थकित आहेत. यासंदर्भात गेल्यावर्षी जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार केली होती. परंतू प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. आता या ग्रामसभांनी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांसह वनविभाग, पोलीस विभाग आणि आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला निवेदन देऊन आपली व्यथा मांडली आहे.

वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावे कंत्राट५ ग्रामसभांची रॉयल्टीची रक्कम न देता आता कंत्राटदार पटेल हे वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाने एटापल्ली आणि धानोरा तालुक्यात तेंदूपत्ता संकलनाचा व्यवसाय करत असल्याचे ग्रामसभांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे सदर कंत्राटदाराची मालवाहतूक करणारी वाहने तात्काळ थांबवून ती ताब्यात घ्यावी, अशी मागणी पाचही ग्रामसभांच्या वतीने जि.प.सदस्य सैनू गोटा, दोहे हेडो, रैनू पुंगाटी, मंगेश होळी, रामजी गोटा, मंगेश देवू नरोटे यांनी केली आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी