लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्ह्यातील नऊ नगरपंचायतीत १४१ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी ५९४ नामांकन वैध ठरले आहेत. १३ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे आहेत. त्यानंतरच निवडणूक लढणाऱ्यांचा आकडा निश्चित हाेईल. तालुकास्थळाच्या गावाचे नगरपंचायतीत रूपांतर केल्यानंतर ही दुसरी निवडणूक आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये माेठ्या प्रमाणात उत्साह हाेता. मात्र न्यायालयाच्या निर्देशानंतर नामाप्रसाठी आरक्षित जागा वगळून निवडणूक घेतली जात आहे. त्यामुळे निवडणुकीतील उत्साह थाेडेफार कमी झाला आहे. नामाप्र गटातून निवडणूक लढण्याची संधी मिळत नसल्याने या उमेदवारी आता आपला माेर्चा खुल्या जागेकडे वळविला आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गाच्या प्रभागात उमेदवारांची माेठ्या प्रमाणात गर्दी झाली असून, या ठिकाणी काट्याची टक्कर बघायला मिळणार आहे. प्रत्येक प्रभागातून एकच उमेदवार निवडून द्यायचा आहे. त्यामुळे प्रत्येकाला निवडणूक जिंकण्यासाठी चांगलीच मेहनत करावी लागणार आहे. काही उमेदवारांवर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सुद्धा दबाव राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खुल्या प्रवर्गात अर्जांचा पाउसनामाप्रसाठी आरक्षित असलेले चामाेर्शी नगरपंचायतीमधील ४, सिराेंचामधील ३, कुरखेडा २, अहेरी व धानाेरा येथील प्रत्येकी एका प्रभागाची निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे या प्रभागांमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आता आपला माेर्चा खुल्या प्रवर्गाकडे वळविला आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गाच्या प्रभागात माेठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले आहेत. या उमेदवारांमध्ये काट्याची लढत हाेणार आहे.