शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जलयुक्त शिवारची ५८३ कामे अपूर्णच

By admin | Updated: May 30, 2017 00:41 IST

राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार अभियानांतर्गत भुगर्भातील पाण्याची पातळी वाढावी, ...

३० जूनपर्यंतची मुदत : १५२२ कामांना सुरूवातही नाही!लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार अभियानांतर्गत भुगर्भातील पाण्याची पातळी वाढावी, शेतऱ्यांना सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी २०१६-१७ या आर्थिक वर्षात विविध यंत्रणांची ४६११ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र मे महिना संपत आला तरी त्यापैकी केवळ २५०६ कामेच पूर्ण झाली आहेत. ५८३ कामे प्रगतीपथावर आहेत. तर १५२२ कामांना अद्याप सुरूवातही झालेली नाही. त्यामुळे ३० जूनपर्यतच्या मुदतीत ही कामे पूर्ण कशी करणार? हे एक आव्हान ठरले आहे.कृषी विभाग, जिल्हा परिषद (मनरेगा), वन विभाग, जिल्हा परिषद (सिंचन), लघुसिंचन (जलसंधारण) आणि चंद्रपूर पाटबंधारे विभाग (जलसंपदा) आदी विभागांकडे ही ४६११ कामांची जबाबदारी वाटून देण्यात आली होती. या अभियानाच्या अंमलबजावणी समितीचे सचिव म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे जबाबदारी आहे. मात्र त्यांचा कृषी विभागच या कामात सर्वाधिक मागे राहिला आहे. कृषी विभागाने गेल्या वर्षासाठी १६९ गावांमध्ये ३१२८ कामे प्रस्तावित केली होती. मात्र त्यापैकी केवळ १६८२ कामे सुरू केली. त्यातही १३९४ कामेच आतापर्यंत पूर्णत्वास गेली असून २८८ कामे सुरू आहेत. जिल्हा परिषद सिंचन विभागाने १४६ कामे प्रस्तावित असताना १६६ कामांना सुरूवात केली. पण पूर्ण केवळ ७९ कामे केली असून ८७ कामे सुरू आहेत. केवळ वनविभागाने ७१४ प्रस्तावित कामांपैकी ६८५ कामे सुरू करून ती सर्व कामे पूर्ण केली आहेत. चंद्रपूर पाटबंधारे (जलसंपदा) विभागाला केवळ ४ कामे करायची होती. ती चारही कामे त्यांनी सुरू तर केली, मात्र पूर्णत्वास एकही नेले नाही. आतापर्यंत झालेल्या गेल्या आर्थिक वर्षातील कामांवर ३२.८८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे २१६९८ टीएमसी पाणीसाठ्याचा संचय या पावसाळ्यात होणार आहे. प्रगतीपथावरील कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी दिले आहेत. मात्र यावर्षी लवकर पाऊस येत असल्याचे संकेत हवामान खात्याने दिल्याने ही कामे खऱ्या अर्थाने पूर्णत्वास जातील की कागदोपत्रीच पूर्ण झाल्याचे दाखविले जाईल, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.नवीन आर्थिक वर्षासाठी ३७९९ कामे प्रस्तावितगेल्या आर्थिक वर्षातील १५२२ कामांना सुरूवात झालेली नसली तरी वर्ष २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी ३७९१ कामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ८७ कोटी ७० लाख ४ हजार रुपये निधीची आवश्यकता आहे. नवीन आर्थिक वर्षातील तीन महिने संपले असताना नियोजित कामांपैकी एकाही कामाला सुरूवात नाही. आता पुढील तीन महिने पावसाळ्याचे राहणार असल्यामुळे या काळात जलयुक्त शिवारची कामे होणे शक्य नाही. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या शेवटच्या ६ महिन्यात ३७९१ कामे कशी होणार? हा प्रश्न कायम आहे.जलयुक्त शिवारची कामे सुरूच आहेत. जून अखेरपर्यंत गेल्या आर्थिक वर्षातील कामे पूर्ण होतील. काही कामांच्या वर्क आॅर्डर दिल्या आहेत. मी ४-५ दिवसांपासून सुटीवर असल्यामुळे आताची नेमकी स्थिती माहित नाही.-अनंत पोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा सचिव, जलयुक्त शिवार अभियान