शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

५८ टक्के कोरोनारुग्ण सप्टेंबरमध्ये बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 05:00 IST

आतापर्यंत, म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत या जिल्ह्यात २८१८ जणांना कोरोनाने ग्रासले आहे. त्यापैकी १९५९ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मातही केली. मात्र २१ जणांना प्राणाला मुकावे लागले, तर ८३८ जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. मृत्यू झालेल्या २१ पैकी २० जणांचा मृत्यू एकट्या सप्टेंबर महिन्यात झाला आहे. याशिवाय एकूण २८१८ रुग्णांपैकी १६४५ रुग्ण (५८ टक्के) सप्टेंबर महिन्यात बाधित झाले आहेत.

ठळक मुद्देकोरोनाचा उद्रेक : ३० दिवसात २० जणांना मृत्यूने कवटाळले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होण्यासाठी सप्टेंबर महिना सर्वाधिक पोषक ठरला आहे. आतापर्यंत बाधित झालेल्या कोरोनाच्या रुग्णांपैकी तब्बल ५८ टक्के रुग्ण केवळ या एकाच महिन्यातील आहेत. एवढेच नाही तर सप्टेंबर महिन्याच्या ३० दिवसात २० जणांचा मृत्यूही झाला आहे. आता ऑक्टोबर महिन्यात ही परिस्थिती थोडी नियंत्रणात येईल, की यापेक्षाही स्थिती बिघडेल याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे.आतापर्यंत, म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत या जिल्ह्यात २८१८ जणांना कोरोनाने ग्रासले आहे. त्यापैकी १९५९ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मातही केली. मात्र २१ जणांना प्राणाला मुकावे लागले, तर ८३८ जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. मृत्यू झालेल्या २१ पैकी २० जणांचा मृत्यू एकट्या सप्टेंबर महिन्यात झाला आहे. याशिवाय एकूण २८१८ रुग्णांपैकी १६४५ रुग्ण (५८ टक्के) सप्टेंबर महिन्यात बाधित झाले आहेत. यावरून कोरोनाचा उद्रेक वाढण्यासाठी सप्टेंबर महिना किती घातक ठरला याची कल्पना येते.बुधवारी आढळलेल्या नवीन १०७ कोरोनाबाधितांमध्ये गडचिरोली येथील ३४ जणांचा समावेश आहे. याशिवाय अहेरी येथील ९, आरमोरी येथील ७, चामोर्शी ७, कोरची येथील ३, कुरखेडा येथील २, वडसा येथील ७, मुलचेरा येथील २, एटापल्ली येथील २२, धानोरा येथील १२, भामरागड येथील २ जणांचा समावेश आहे.गडचिरोलीमधील ३४ जणांमध्ये कन्नमवार वार्डचे २, आशीर्वाद नगर १, खरपुंडी १, सीआरपीएफ एमआयडीसी १, आयोध्यानगर २, कॅम्प एरिया ३, नवेगाव ५, गोकुळनगर १, आयटीआय चौक २, जेप्रा १, कोटगल १, लांजेडा १, माडेतुकूम १, मुरखळा १, विद्या भारती शाळेजवळ १, वियानी शाळेजवळ १, पंचवटी नगर १, अमिर्झा १, पोटेगाव रोड फॉरेस्ट कॉलनी १, रामपुरी वार्ड १, स्नेहा नगर, सोनापूर कॉम्प्लेक्स १, एसटी डेपोजवळ १, एसटी संकुल १ यांचा समावेश आहे.कोरची तालुक्यामधील ३ असून त्यामध्ये बोरी १, गुटेकसा १ व शहरातील १ जण, कुरखेडा तालुक्यात २ असून एक अंगारा व एक नगरातील आहे. अहेरी येथील ९ मध्ये जणांत शहरातील ७ तर महागावचे २ जण आहेत. आरमोरी तालुक्यतील ७ मध्ये शहरातील ३, ठाणेगाव २ आणि वैरागडचे २ जण आहेत. भामरागड शहरातील २ जण बाधित आढळून आले आहेत. चामोर्शीतील ७ मध्ये शहरातील ३, आष्टी २, येनापूर १ व तळोधी १ आहे. धानोरा तालुक्यातील १२ मध्ये शहरातील २, मुरूमगाव १ व ९ जण पोलीस स्टेशन गोदलवाहीचे आहेत.एटापल्लीमधील २२ जणांमध्ये १५ शहरातील सीआरपीएफ जवान आहेत तर हेडरीचे ७ जण आहेत. मुलचेरातील २ जण आहेत. देसाईगंजच्या ७ मध्ये सीआरपीएफ २, गांधी वार्ड १, कुरूड १, माता मंदिर १ व पोलीस स्टेशनजवळील एका जणाचा समावेश आहे.कोरोनामुक्त झालेल्या २६ जणांमध्ये गडचिरोलीमधील १७, अहेरी २, आरमोरी १, भामरागड १, चामोर्शी २, सिरोंचा १, वडसा २ आदींचा समावेश आहे.देसाईगंजमधील महिला दगावलीबुधवार दि.३० ला कोरोनाबाधित एका महिलेच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाने घेतली. ती ६५ वर्षी महिला देसाईगंजच्या गांधी वॉर्डमधील रहिवासी होती. यासोबतच नवीन १०७ कोरोनाबाधितांची नोंद झाली. दरम्यान २६ जण कोरानामुक्तही झाले आहेत. पण नव्याने वाढत असलेल्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्यामुळे क्रियाशिल रुग्णांची संख्या वाढत असून ती आता ८३८ झाली आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या