शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
3
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
4
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
5
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
6
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
7
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
8
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
9
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
10
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
11
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
12
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
13
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
14
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
15
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
16
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
17
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
18
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
19
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
20
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!

जिल्ह्यात ५७ रस्त्यांच्या कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:39 IST

दळणवळणासाठी अत्यावश्यक असणाऱ्या चांगल्या रस्त्यांची जिल्ह्यात नेहमीच कमतरता भासली आहे. या कामांत विविध प्रकारच्या अडचणी असल्या तरी नवीन आर्थिक वर्षात जिल्ह्यात .....

ठळक मुद्देखड्डेमय रूप पालटणार : कुरखेडा, आरमोरी, एटापल्ली तालुक्यातील सर्वाधिक रस्त्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दळणवळणासाठी अत्यावश्यक असणाऱ्या चांगल्या रस्त्यांची जिल्ह्यात नेहमीच कमतरता भासली आहे. या कामांत विविध प्रकारच्या अडचणी असल्या तरी नवीन आर्थिक वर्षात जिल्ह्यात वेगवेगळ्या योजनांमधील निधीतून ५७ रस्त्यांची कामे केले जाणार आहेत. त्यात प्रामुख्याने कुरखेडा, आरमोरी आणि एटापल्लीच्या दुर्गम भागातील कामांचा समावेश आहे. याशिवाय गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातील कामेही होणार आहेत.२०१८-१९ या नवीन आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याला विविध योजनांमधून निधी मिळणार आहे. त्यातून या ५७ रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली. त्यात सर्वाधिक ३१ कामे आदिवासी उपयोजनेतून केली जाणार आहेत. त्यात एटापल्ली, डुम्मेजवली, गोमणी, कोडीगाव, तुमरगुडा, शांतीग्राम रस्त्याची सुधारणा करणे, कासमपल्ली, उडेरा, तुमगुडा रस्त्याची सुधारणा करणे, गोदलवाही, मिचगाव, पुलखल, पेंढरी, जाराबंडी, कसनसूर रस्त्याची सुधारणा, दवंडी ते जांभळी रस्त्याची सुधारणा, जांभळी ते दवंडी धापा ड्रेनेजचे बांधकाम, थोडेबोडी, नागरवाही रस्त्याची सुधारणा, थोटेबोडी, देलनवाडी रस्त्याची सुधारणा, कुरंडीमाल ते खोब्रागडे नदीकडे जाणाºया रस्त्याची सुधारणा, मोहझरी ते खोब्रागडी नदीवरून जाणाऱ्या रस्त्याची सुधारणा, मोहझरी ते इजिमा २ पोच मार्गाची सुधारणा, भान्सी ते जांबळी रस्त्याची सुधारणा, दवंडी ते जांबळी रस्त्याची सुधारणा, दवंडी येथे अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम, जांबळी ते दवंडी धापा ड्रेनेजचे बांधकाम, मरपल्ली ते पल्लीरेला खडीकरण, पर्ली-बामनपल्ली रस्त्याचे खडीकरण, कुसूरवाही ते पेंदूलवाही रस्त्याचे बांधकाम करणे, मौजा पुन्नूर पोचमार्गाचे मजबुतीकरण, मोठ्या मोरीचे बांधकाम करणे, मौजा घोटसूर ते गुंडम रस्त्यावर मोठ्या मोरीचे बांधकाम, मौजा बहादूरपूर मुख्य रस्त्यापासून फुकटनगर नवीन वस्तीपर्यंत खडीकरण व डांबरीकरण, कुरखेडा तालुक्यातील घाटी येथे बस स्थानक ते एनएनएम उपकेंद्राकडे जाणाºया रस्त्याचे बांधकाम करणे, वाकडी पलसगड, साधुटोला, रस्त्याची सुधारणा करणे, घोडेगाव ते अंजनटोला रस्त्याची सुधारणा करणे, चारभट्टी मसेली रस्त्याची सुधारणा करणे, दादापूर, रामगड, वागदरा रस्त्याची सुधारणा करणे आदी कामे केली जाणार आहेत.डावी कडवी विचारसरणी अंतर्गत रस्ते जोडणी प्रकल्पातून १० रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. त्यांची किंमत १४३ कोटी ४६ लाख रुपये आहे. त्या रस्त्यांमध्ये हालवेर, मरकणार, हिकेर, हिंदूर, गोडूर या मार्गाचे बांधकाम, भामरागड, हेमलकसा, कासमपल्ली, कियार, हलवेर, पुरसलगोंदी, सुरजागड रस्त्याचे बांधकाम, हालेवाडा, कडली, कोठी (पिंपली बुरगी) रस्त्याचे बांधकाम, राज्य महामार्ग ९ ते कमलापूर, दामरंचा, मन्नेराजाराम, ताडगाव, कांडली, उंदेडा रस्त्याचे बांधकाम, झिंगानूर, एडसिली, कामसूर रस्त्याचे बांधकाम, विठ्ठलरावमाल, पेठा चक ते भिमराम, नरसिंहपल्ली, रेगुंटा, परमिंडा मार्गाचे बांधकाम, जाराबंडी, भापाडा, सहगाव रस्त्याचे बांधकाम, सावरगाव, कोटगुल ते गांगिन मार्गाचे बांधकाम, नेहालकल, टिपागड अ‍ॅप्रोच रस्त्याचे बांधकाम, राजोली जामगाव ते कोटमी, पयडी मार्गाचे बांधकाम आदी कामांचा समावेश आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार केल्या जाणाºया रस्त्यांच्या कामांमध्ये कारवाफा, पुस्टोला, पेंढरी ते राज्य सीमापर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण, एटापल्ली, परसलगोंदी, गट्टा मार्गात सुधारणा करणे, चंद्रपूर घंटाचौकी, मूल, चामोर्शी, घोट, मुलचेरा, आलापल्ली, अहेरी, देवलमारी, बेजुरपल्ली, रस्त्याचे डांबरीकरण व नुतनीकरण करणे, रेगडी, कोटमी, कसनसूर, गट्टा, कोठी, आरेवाडा, भामरागड ते राज्य सीमा रस्त्याचे डांबरीकरण व नुतनीकरण, तळोधी, आमगाव, भाडभिडी, रेगडी, देवडा रस्त्याची सुधारणा, रांगी, चातगाव, कारवाफा, सावेला, पोटेगाव, घोट रामा रस्त्याची सुधारणा, चंद्रपूर घंटाचौकी, मूल, चामोर्शी, घोट, मुलचेरा, आलापल्ली, अहेरी, देवलमारी, बेजुरपल्ली रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण व गटाराचे बांधकाम, भाडभिडी, घोट, कसनसूर रस्त्याची सुधारणा केली जाणार आहे.कोरची तालुक्यातील सावरगाव, कोटगुल, प्रतापगड रस्ता प्रस्तावित जिल्हा महामार्ग ३ चे व बेडगाव, टेमली, कुकडेल, तहकाटोला, प्र.जिल्हा महामार्ग ४५ चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, कुरखेडा, मालेवाडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण, तसेच झिंगानूर, कोपेला, प्र.जिल्हा महामार्ग २६ ची सुधारणा करणे, मौशीखांब, वडधा, वैरागड, शंकरपूर, चोप, कोरेगाव ते जिल्हा सीमेपर्यंत प्र.जिल्हा महामार्ग रस्त्याचे डांबरीकरण व नुतनीकरण करणे, मालेगाव, प्रतापगड, प्र.जिल्हा महामार्ग ४ चे डांबरीकरण व नुतनीकरण करणे आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे.