शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

५७ शेतकऱ्यांनी जाणले भाजीपाला लागवड तंत्र

By admin | Updated: March 30, 2017 02:03 IST

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील बाएफ मित्रा संस्थेच्या ५७ शेतकऱ्यांनी गडचिरोली येथील कृषी विज्ञान

कृषी विज्ञान केंद्राला भेट : भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील शेतकरी गडचिरोली : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील बाएफ मित्रा संस्थेच्या ५७ शेतकऱ्यांनी गडचिरोली येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली व भाजीपाला लागवडीचे आधुनिक तंत्र जाणून घेतले. भेटीदरम्यान उद्यान विद्या विषय विशेषज्ञ अनिल तारू यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर लागवड केलेल्या विविध प्रात्यक्षिकांविषयी तसेच पिकांविषयीची माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने भाजीपाला पिकाविषयी मार्गदर्शन केले. कोबी, वांगे, भेंडी यांची लागवड कशा पद्धतीने करावी, याबाबत माहिती दिली. पशु व दुग्ध शास्त्र विषय विशेषतज्ज्ञ डॉ. विक्रम कदम यांनी दूध वाढविण्यासाठी बरशिमचा उपयोग, गांडूळखत निर्मिती तसेच गांडूळ खताचे शेतीमधील महत्त्व पटवून दिले. गांडूळ खत निर्मिती करण्याचे आवाहन केले. मुक्तसंचार गोठा कशा पद्धतीने तयार करावा, या प्रकारच्या गोठ्यामुळे जनावरांवर कोणता सकारात्मक परिणाम दिसून येतो, याविषयी मार्गदर्शन केले. पीक संरक्षण विषय विशेषतज्ज्ञ पुष्पक बोथीकर यांनी रब्बी पिकावर येणारे कीड व रोग याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. भाजीपाला लागवड करताना घ्यावयाची काळजी, भाजीपाल्यावर येणारे रोग, त्याचबरोबर रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी फवारायची कीटकनाशके याबाबत मार्गदर्शन केले. कृषी अभियांत्रिकी विषय विशेषतज्ज्ञ ज्ञानेश्वर ताथोड यांनी शेतीसाठी उपयोगी असलेली विविध अवजारे कशा पद्धतीने वापरावी, त्यांचे शेतीमध्ये असलेले महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. मिनी पॉवर टिलर, धान रोवणी यंत्र, ग्रास कटर यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. शेतकऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. जंगली जनावरांचा त्रास कमी करण्यासाठी सोलर फेन्सींगबाबत मार्गदर्शन केले. यावेळी हितेश राठोड, प्रवीण नामुर्ते, जितेंद्र कस्तुरे, सुनीता थोटे, ज्योती परसुटकर उपस्थित होते. त्यांनी येथील सर्व कृषीविषयक कामाची माहिती जाणून घेतली. (नगर प्रतिनिधी)