शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

५६७ कामांना मंजुरी

By admin | Updated: December 27, 2014 22:49 IST

मागास क्षेत्र अनुदान निधी अंतर्गत जिल्हाभरात ग्रामपंचायतीस्तरावर सिमेंट काँक्रीट रस्ते, नाली बांधकाम, संरक्षण भिंत, विहिर बांधकाम आदीसह विविध प्रकारच्या एकूण ५६७ कामांना

बीआरजीएफ : अखेर २१ कोटी ८२ लाखांचा निधी मिळालागडचिरोली : मागास क्षेत्र अनुदान निधी अंतर्गत जिल्हाभरात ग्रामपंचायतीस्तरावर सिमेंट काँक्रीट रस्ते, नाली बांधकाम, संरक्षण भिंत, विहिर बांधकाम आदीसह विविध प्रकारच्या एकूण ५६७ कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळाली आहे. या कामांसाठी जिल्ह्याला २१ कोटी ८२ लाख रूपयाचा निधी प्राप्त झाला असल्याने बीआरजीएफची ही कामे आता सुरू होणार आहेत.केंद्र, राज्य, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीतून सर्वच विकास कामे शक्य होत नाहीत. विकास कामात मागे राहिलेल्या गावांचा विकास साधण्यासाठी मागास क्षेत्र अनुदान निधींतर्गत दरवर्षी ग्रामपंचायतस्तरावर विविध कामे घेतली जाते. बीआरजीएफ अंतर्गत शासनाने ठरवून दिलेल्या १० सेक्टरमधील विकास कामे केली जातात. यामध्ये गावात सोलर लाईट, पाईप लाईन, सिमेंट काँक्रीट रस्ते, नाली, विहिरगाव बांधकाम, हातपंप, मोटारपंप खरेदी, अंगणवाडी, इमारत, अंगणवाडी किचन शेड, ग्रामपंचायत भवन, ग्रामपंचायत विस्तारीकरण, मोरी, दुकान गाळे बांधकाम, शाळा विद्युतीकरण, शाळेत पिण्याच्या पाण्याची सुविधा, खेळांचे मैदान, सार्वजनिक शौचालय, सांस्कृतिक भवन, कोंडवाडा बांधकाम, मुरूम रस्ते, समाज मंदिर व लहान पुलांचे बांधकाम आदी कामांचा समावेश आहे. जि.प. प्रशासनाच्यावतीने बीआरजीएफच्या कामाबाबत ग्रामपंचायतस्तरावरून मागणी व प्रस्ताव मागविण्यात आले. त्यानंतर २०१४-१५ या वर्षाचा आराखडा निश्चित करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बीआरजीएफ अंतर्गत सन २०१४-१५ या वर्षाकरिता बाराही तालुक्यातील ग्रामपंचायतस्तरावरील ५६७ कामांना मंजुरी प्रदान केली. मात्र प्रशासनाला या कामाचा निधी मिळाला नव्हता. त्यामुळे बीआरजीएफची मंजूर कामे सुरू करण्यात आली नाही. दरम्यान शासनाने पाच दिवसांपूर्वी बीआरजीएफच्या या कामांसाठी २१ कोटी ८२ लाखाचा निधी प्रशासनाकडे वळता केला. मंजूर करण्यात आलेल्या अहेरी तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीमध्ये ६८ कामांचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीमध्ये ३२, भामरागड तालुक्यातील २० ग्रामपंचायतीमध्ये २१, चामोर्शी तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीमध्ये ७९, देसाईगंज तालुक्यातील १९ ग्रा.पं.मध्ये २६, धानोरा तालुक्यातील ६२ ग्रा.पं.मध्ये ५७, एटापल्ली तालुक्यातील ३२ ग्रा.पं.मध्ये ४२, गडचिरोली तालुक्यातील ५१ ग्रा.पं.मध्ये ६६, कोरची तालुक्यातील ३० ग्रा.पं.मध्ये ३८, कुरखेडा तालुक्यातील ४५ ग्रा.पं.मध्ये ६५, मुलचेरा तालुक्यातील १७ ग्रा.पं.मध्ये ३०, सिरोंचा तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतीमध्ये ४३ कामांचा समावेश आहे. मंजूर झालेली सदर कामे ग्रामपंचायतीमार्फत येत्या काही दिवसात सुरू होणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)