शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेकडे ५४ कोटी जमा

By admin | Updated: November 19, 2016 01:51 IST

नोट बंदीच्या निर्णयानंतर १० ते १३ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जुन्या ५०० व १०००

५५ शाखांमध्ये काम : १००० व ५०० च्या जुन्या नोटा स्वीकारल्याने चार दिवसांतील रक्कमगडचिरोली : नोट बंदीच्या निर्णयानंतर १० ते १३ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जुन्या ५०० व १००० रूपयांच्या नोटा स्वीकारण्याचे अधिकार दिले होते. या चार दिवसांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे ५३ कोटी ५६ लाख २ हजार ५०० रूपयांची रोकड जमा झाली आहे. ज्या बँकांना रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाची परवानगी आहे. अशा सर्वच बँकांना ५०० व १००० रूपयांच्या नोटा स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नागरिकांकडील जुन्या नोटा स्वीकारण्यास सुरूवात केली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हाभरात विशेष करून ग्रामीण भागात एकूण ५५ शाखा कार्यरत आहेत व या बँकेशी चार लाख ग्राहक जुळलेले आहेत. ५०० व १००० रूपयांच्या नोटा बंद झाल्याचे लोण ग्रामीण भागापर्यंत पोहोचताच ग्रामीण भागातील नागरिकांनीही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमध्ये गर्दी करून नोटा जमा करण्यास सुरूवात केली. १० ते १३ नोव्हेंबर या चार दिवसांच्या कालावधीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वच शाखांच्या माध्यमातून ५३ कोटी ५६ लाख २ हजार ५०० रूपयांचे जुने नोट स्वीकारण्यात आले. त्यानंतर मात्र १४ नोव्हेंबरपासून रिझर्व्ह बँकेने जिल्हा सहकारी बँकांमध्ये ५०० व १००० ची नोट स्वीकारण्यास मनाई केली. तेव्हापासून बँकेच्या शाखांनी नोटा स्वीकारणे बंद केले. केवळ चार दिवसात ५४ कोटी रूपये जमा झाले आहेत. पैसे स्वीकारण्याची परवानगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कायम राहिली असती कर हा आकडा शेकडो कोटी रूपयांच्या वर गेला असता. जिल्हा बँकेला पैसे स्वीकारण्यास बंदी घातल्याने ग्रामीण नागरिकांची अडचण वाढली आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे प्राप्त झालेल्या जुन्या नोटांपैकी ७५ टक्के रक्कम रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडे जमा करण्यात आली आहे. केवळ २५ टक्के रक्कम बँकेकडे शिल्लक आहे. सदर रक्कम सुध्दा रिझर्व्ह बँकेकडे येत्या काही दिवसात जमा केली जाईल, अशी माहिती प्राप्त झाली आहे. आता जिल्हा सहकारी बँकेत जुन्या नोटा स्वीकारण्यात येत नसल्याने दुर्गम व अतिदुर्गम भागातील ग्राहकांना राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन खाते उघडून नोटा जमा कराव्या लागत आहे. त्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. (नगर प्रतिनिधी)नोटा बदलविण्यासाठी तालुकस्तरावर धावजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रामुख्याने ग्रामीण भागात शाखा आहेत. ग्रामीण भागातील संजय गांधी निराधार योजना, विद्यार्थी, शेतकरी यांचे बँक खाते प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत आहेत. मात्र केंद्र शासनाने या बँकांना ५०० व १००० रूपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची फार मोठी गोची झाली आहे. पैसे बदलविण्यासाठी तालुकास्तरावरील राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखेमध्ये नागरिकांना धाव घ्यावी लागत आहे. याही शाखेत केवळ दोन हजार रूपयेच बदलवून दिले जात असल्याने उर्वरित रकमेचे काय करावे, असा गहण प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.