शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोट प्रकरणः प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
2
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
3
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
5
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
6
२ ऑगस्टला जग अंधारात बुडणार नाही; दा. कृ. सोमण यांचे स्पष्टीकरण
7
ट्रम्प यांच्या २५% टॅरिफच्या घोषणेनंतर भारतातील 'हे' शेअर्स जोरदार आपटले; विकण्यासाठी रांग, तुमच्याकडे आहेत?
8
ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली
9
अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?
10
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
11
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
12
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
13
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
14
मेघा धाडेनं सांगितलं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, म्हणाली - "त्या दिवशी मला..."
15
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
16
Hit and run: २१ वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं अन् पळून गेली; कोण आहे नंदिनी कश्यप?
17
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
18
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
19
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
20
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!

५३ टक्के बालकांना ‘आधार’

By admin | Updated: July 26, 2015 02:36 IST

शून्य ते पाच वयोगटातील बालकांचे आधारकार्ड काढण्याची मोहीम सहा महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली.

३९ केंद्रांवर ४९ किट सुरू : ९ लाख ३७ हजार नागरिकांना मिळाले आधारकार्डदिगांबर जवादे गडचिरोलीशून्य ते पाच वयोगटातील बालकांचे आधारकार्ड काढण्याची मोहीम सहा महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात या वयाचे जवळपास ७५ हजार बालके असून मागील आठवड्यापर्यंत यापैकी ३९ हजार ६६९ बालकांचे आधारकार्ड काढण्यात आले असून हे काम निर्धारित उद्दिष्टाच्या ५३ टक्के पूर्ण झाले आहे.प्रत्येक नागरिकाला आधारकार्ड उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतल्यानंतर सर्वप्रथम नागरिकांचे आधारकार्ड काढण्यात येत होते. नागरिकांचे आधारकार्ड काढण्याचे काम जवळपास ७० ते ८० टक्के पूर्ण झाल्यानंतर शासनाने शून्य ते पाच वयोगटातील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्याची मोहीम मागील सहा महिन्यांपासून हाती घेण्यात आली आहे. लहान बालकांनाही शासनाकडून विविध योजनांचा लाभ दिल्या जातो. बऱ्याच वेळा काही लाभार्थी एकाच योजनेचा दोन जिल्ह्यातून लाभ घेतात. यामुळे शासनाची फसवणूक होऊन आर्थिक बोजाही सहन करावा लागतो. त्यामुळे शून्य ते पाच वयोगटातीलही बालकांचे आधारकार्ड काढण्यास सुरुवात झाली आहे.सहा महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान गडचिरोली जिल्ह्यात जवळपास ७५ हजार बालके असल्याची नोंद आहे. त्यानंतर या बालकांचे आधारकार्ड काढण्याचे उद्दिष्ट ठेवून आधारकार्ड काढण्यास सुरुवात झाली. मागील आठवड्यापर्यंत सुमारे ३९ हजार ६६९ बालकांचे आधारकार्ड काढण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती इतर जिल्ह्यांच्या तुलनेत भिन्न आहे. त्यामुळे आधारकार्ड काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरीही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आधारकार्ड काढण्याची गती समाधानकारक आहे, असेच म्हणावे लागेल. बहुतांश गावांमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे तालुकास्थळावर येऊन माहिती पाठवावी लागते. शाळा, अंगणवाडी केंद्र यामध्ये आधारकार्ड काढण्याचे केंद्र उभारले जाते. मात्र अनेक शाळांमध्ये विजेची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे आधारकार्ड काढण्याची यंत्रणा चालविण्यास अडचण निर्माण होते. अनेक नागरिकांना आधारकार्डचे महत्त्व माहीत नाही. त्यांना आधारकार्ड महत्त्व समजावून सांगावे लागते. यासारख्या अनेक अडचणी आहेत. या सर्व अडथळ्यांवर मात करून आधारकार्ड काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या १० लाख ७१ हजार ७९५ एवढी आहे. त्यातील ९ लाख ३७ हजार ४८९ नागरिकांचे आधारकार्ड काढण्यात आले आहेत. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ८७.४७ टक्के एवढे आहे. ३९ आधार केंद्र सुरूआधारकार्ड काढण्यासाठी प्रत्येक तालुकास्थळावर एक याप्रमाणे १२ तालुक्यांमध्ये १२ स्थायी आधारकार्ड केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय २७ केंद्र अस्थायी असून त्यांच्या मार्फतीने ग्रामीण भागात तसेच शहरातील अंगणवाड्यांमध्ये फिरून आधारकार्ड काढण्यात येत आहेत. या एकूण ३९ केंद्रांवर ४९ किट सद्यस्थितीत कार्यरत आहेत. गडचिरोली जिल्ह्याला एकूण ५२ किट प्राप्त झाल्या आहेत. त्यातील दोन किटमध्ये काही तांत्रिक बिघाड आल्याने त्या बंद आहेत. त्या किटही दुरूस्त केल्या जाणार आहेत. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत समाधानकारक कामगिरीबहुतांश जिल्ह्यांमध्ये ७५ ते ९५ टक्क्यादरम्यान आधारकार्ड काढण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वेगळी आहे. तरीही एकूण नागरिकांच्या ८७.४७ टक्के नागरिकांचे आधारकार्ड काढण्यात आले आहेत. विकसित समजल्या जाणाऱ्या सोलापूर, परभणी, पुणे या जिल्ह्यांमध्ये अजूनही आधारकार्डचे प्रमाण ८० टक्क्यांच्या खालीच असल्याचे दिसून येते. बालकांचे आधारकार्ड काढण्यासही गती मिळाली आहे. आधारकार्ड सक्तीचे नसले तरी अत्यावश्यक आहेआधारकार्ड नाही म्हणून कोणत्याही नागरिकाला शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित ठेवता येत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यामुळे आधारकार्ड सक्तीचे नाही. मात्र आधारकार्ड नसले तर आगाऊचे कागदपत्रे नागरिकाला जोडावी लागतात. बरेच अधिकारी आधारकार्ड नसल्यास योजनेचा लाभ देण्यास विलंब करतात. या सर्व भानगडी टाळण्यासाठी नागरिकाने स्वत:चा आधारकार्ड काढणे आवश्यक आहे. बहुतांश नागरिकांना आधारकार्डचे महत्त्व अजूनही कळले नसल्याने ते आधारकार्ड काढण्यास तयार होत नाही. भामरागड, एटापल्ली, कोरची, धानोरा या तालुक्यांमध्ये काम करताना थोडी अडचण जाणवत आहे. मात्र याच तालुक्यांमधील गरीब नागरिकांना आधारकार्डची खरी गरज असल्याने तेथील नागरिकांना आधारकार्डचे महत्त्व पटवून देऊन आधारकार्ड काढण्यात येत आहेत. आतापर्यंत ५३ टक्के बालकांचे व ८७ टक्के नागरिकांचे आधारकार्ड निघाले असले तरी १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा काम करीत आहे.- सचिन मून, जिल्हा ई-प्रकल्प अधिकारी, गडचिरोली