शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

५३ उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Updated: March 31, 2015 01:17 IST

महाराष्ट्रात सर्वात उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक असलेल्या दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या

१८ जागा अविरोध येण्याची शक्यता : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक गडचिरोली : महाराष्ट्रात सर्वात उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक असलेल्या दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. सोमवारी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी २१ जागांसाठी ५३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. १८ गटामध्ये केवळ एकाच उमेदवाराचा अर्ज दाखल झाला असल्यामुळे या ठिकाणी निवडणूक अविरोध होण्याची चिन्ह दिसत आहे. सत्ताधारी पोरेड्डीवार गटाकडूनच अनेक नामांकन अर्ज दाखल असल्यामुळे पुन्हा या गटाचेच बँकेवर वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. ‘अ’ गटातून बँकेवर ९ संचालक निवडून द्यावयाचे आहे. कुरखेडा-कोरची या तालुक्याच्याय गटातून खेमनाथ सिताराम डोंगरवार यांचे दोन नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. चामोर्शी-मुलचेरा तालुक्याच्या गटातून अमोल गंगाधरराव गण्यारपवार यांचे दोन तर भय्याजी मारोती वाढई यांचे दोन व बंडुजी सोमन्नाजी ऐलावार यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. एटापल्ली-भामरागड तालुक्याच्या गटातून वासुदेव उरकुडा गेडाम यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. गडचिरोली गटातून मुरलीधर रेमाजी झंझाळ यांचे दोन अर्ज दाखल झाले आहे. आरमोरी तालुक्याच्या गटातून दुर्वेश बाबुराव भोयर यांचे दोन, धानोरा तालुका गटातून अनंत घनश्याम साळवे यांचे दोन अर्ज दाखल झाले आहे. देसाईगंज तालुका गटातून पोपटराव मन्साराम तितीरमारे यांचे दोन, सिरोंचा तालुका गटातून श्रीहरी नागन्नाजी भंडारीवार यांचे दोन, अहेरी गटातून अतुल रामन्नाजी नागुलवार यांचा एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.शेतमाल प्रक्रिया संस्था गट ‘ब’ मधून इशांत राजेंद्र पोरेड्डीवार, ज्येष्ठ सहकार नेते अरविंद नामदेवराव पोरेड्डीवार यांचा एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. कृषी पणन संस्था ‘क’ गटातून अरविंद नामदेवराव पोरेड्डीवार यांचे दोन अर्ज दाखल झाले आहे. वैयक्तिक भागधारक व इतर गैरसहकारी संस्था गट ‘ड’ गटातून डॉ. बळवंत मारोतराव लाकडे, प्रकाश नामदेवराव पोरेड्डीवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. नागरी पतसंस्था, मच्छीमार संस्था, जंगल कामगार संस्था इत्यादींच्या ‘ई’ गटातून महेंद्र जनार्धन मने यांचा एक तर खुशाल यादवराव वाघरे यांचे दोन व बाबुराव बेंडुजी बावणे यांचे दोन व राजेंद्र धोंडबा मने यांचा एक अर्ज दाखल झाला आहे. मजूर, दुग्ध उत्पादन, गृहतारण, औद्योगिक व इतर शेती संस्था ‘फ’ गटातून जागोबा तुळशीराम खेडेकर, बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रंचित अरविंद पोरेड्डीवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नागरी सहकारी बँक ‘ग’ गटातून प्रंचित अरविंद पोरेड्डीवार यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. इतर सर्व सहकारी संस्थांच्या ‘य’ गटात प्रकाश नामदेवराव पोरेड्डीवार यांचा एक तर प्रंचित अरविंद पोरेड्डीवार यांचा एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. ‘र’ गटात महिलांच्या दोन राखीव जागांसाठी मीराबाई यादव नाकाडे, शशिकला ज्ञानेश्वर देशमुख या दोनच महिलांचे अर्ज दाखल झाले आहे. अनुसूचित जाती, जमाती राखीव जागेसाठी घनश्याम लहुजी मडावी यांचे दोन, हिरालाल जीवन वालदे यांचा एक अर्ज दाखल झाला आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गासाठीच्या एका जागेसाठी बंडुजी सोमन्नाजी ऐलावार, बाबुराव बेंडूजी बावणे यांचे अर्ज दाखल झाले आहे. इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) च्या जागेसाठी प्रंचित अरविंद पोरेड्डीवार, प्रकाश नामदेवराव पोरेड्डीवार, अरूण तेजराम मुनघाटे यांचे दोन, भय्याजी मारोती वाढई व बळवंत मारोतराव लाकडे यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या निवडणुकीसाठी एकूण ३०८ मतदार मतदान करणार आहेत. ३१ मार्च रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून १ एप्रिलला वैद्य नामांकन पत्राची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. १ ते १५ एप्रिलपर्यंत नामांकन पत्र मागे घेण्यासाठी मुदत राहणार असून १६ एप्रिलला अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध केली जाणार आहे व गरज पडल्यास २६ एप्रिलला मतदान घेतले जाईल. २७ एप्रिल रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. (नगर प्रतिनिधी)