शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

५२७ जागा रिक्त

By admin | Updated: July 28, 2016 01:54 IST

आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील गरीब मुलांना इंग्रजी व मराठी माध्यमाच्या खासगी विनाअनुदानित शाळेत मोफत प्रवेश ....

१०० अ‍ॅडमिशन झाल्या : २५ टक्के मोफत प्रवेश योजना फसली गडचिरोली : आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील गरीब मुलांना इंग्रजी व मराठी माध्यमाच्या खासगी विनाअनुदानित शाळेत मोफत प्रवेश देण्याची योजना राज्य शासनामार्फत राबविली जाते. यंदा २५ टक्के मोफत प्रवेश योजनेंतर्गत ६२७ विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावयाचे होते. आतापर्यंत १०० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून अद्यापही या योजनेतील ५२७ जागा रिक्त आहेत. मोफत प्रवेश प्रक्रियेकडे पालकांनी पाठ फिरविली असल्याचे यावरून दिसून येते. शिक्षणाच्या मोफत व सक्तीच्या अधिकार अधिनियमानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश देण्याची योजना कार्यान्वित केली. १ एप्रिल २०१० पासून या योजनेची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यात सुरू आहे. एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या सर्व मागासवर्गीय व अपंग विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी इयत्ता पहिलीत या योजनेंतर्गत मोफत प्रवेश दिल्या जातो. यंदा सदर योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी जिल्ह्यातील ६६ विनाअनुदानित शाळांनी नोंदणी केली. या योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. एकदा इयत्ता पहिलीत विद्यार्थ्यांचा प्रवेश झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांला इयत्ता आठवीपर्यंत त्याच विनाअनुदानित शाळेमध्ये प्रवेश दिला जातो. अनेक विनाअनुदानित शाळांची प्रवेश शुल्काची रक्कम प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य पालकांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी सदर योजना राज्य शासनाने शिक्षण विभागामार्फत कार्यान्वित केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी) मराठी माध्यमांच्या शाळेत एकही प्रवेश नाही २५ टक्के मोफत प्रवेश योजनेंतर्गत जि.प. शिक्षण विभागाच्या वतीने यंदा मराठी माध्यमांच्या विनाअनुदानित शाळांमध्येही इयत्ता पहिलीत विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावयाचे होते. यंदा इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित शाळेत १०० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. मात्र मराठी माध्यमांच्या विनाअनुदानित शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्यांचा या योजनेंतर्गत प्रवेश झाला नाही. इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची गरज व ओढ असल्याने पालकांनी मराठी माध्यमांच्या शाळांकडे पूर्णत: पाठ फिरविली आहे.