शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जाची ५२ टक्के वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 05:00 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत २०२०-२१ या वर्षात १९ हजार ८३८ शेतकऱ्यांना ६२ काेटी ७३ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले हाेते. १७ मार्चपर्यंत ३२ काेटी ३५ लाख रुपयांच्या कर्जाची वसुली झाली असून, टक्केवारीमध्ये हे प्रमाण ५१.५८ टक्के एवढे आहे. शेतकऱ्यांना बिनव्याजी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनामार्फत मागील काही वर्षांपासून पंजाबराव देशमुख व्याज सवलत याेजना राबविली जात आहे.

ठळक मुद्देजिल्हा बॅंकेची स्थिती, व्याज सवलत याेजनेच्या लाभासाठी धडपड

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : खरीप हंगामासाठी घेतलेले कर्ज ३१ मार्चपूर्वी भरल्यास त्यावर काेणतेही व्याज आकारले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीककर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत २०२०-२१ या वर्षात १९ हजार ८३८ शेतकऱ्यांना ६२ काेटी ७३ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले हाेते. १७ मार्चपर्यंत ३२ काेटी ३५ लाख रुपयांच्या कर्जाची वसुली झाली असून, टक्केवारीमध्ये हे प्रमाण ५१.५८ टक्के एवढे आहे. शेतकऱ्यांना बिनव्याजी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनामार्फत मागील काही वर्षांपासून पंजाबराव देशमुख व्याज सवलत याेजना राबविली जात आहे. या याेजनेची मुख्य अट म्हणजे, खरिपामध्ये घेतलेल्या कर्जाची ३१ मार्चपूर्वी परतफेड हाेणे आवश्यक आहे. अन्यथा व्याज सवलतीचा लाभ दिला जात नाही. संबंधित शेतकऱ्यावर संपूर्ण वर्षाची व्याज आकारली जाते. त्यामुळे बहुतांश शेतकरी ३१ मार्चपूर्वी कर्ज भरण्याचा प्रयत्न करतात. बिनव्याजी कर्ज मिळत असल्याने बहुतांश शेतकरी पीककर्जाची उचल करण्यास प्राधान्य देतात. २०२०-२१ या खरीप हंगामात जिल्हा बॅंकेमार्फत १९ हजार ८३८ शेतकऱ्यांना ६२ काेटी ७३ लाख रुपयांच्या कर्जाचे वितरण केले हाेते. त्यापैकी १७ मार्चपर्यंत ३२ काेटी ३५ लाख रुपयांचा भरणा शेतकऱ्यांनी केला आहे. कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे पुन्हा १२ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.

३१ मार्चपूर्वी पीक कर्ज भरल्यास संबंधित शेतकऱ्याला केवळ कर्जाची मुद्दल रक्कम भरावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा करावा. जे शेतकरी कर्जाचा भरणा करतात, त्यांना कर्ज वितरणाची प्रक्रिया एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरू हाेते. ३१ मार्चनंतर कर्ज भरल्यास व्याज सवलत याेजनेसाठी संबंधित शेतकरी पात्र ठरत नाही. तसेच कर्जही मिळण्यास उशीर हाेतो. मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी कर्जाच्या वसुलीचे प्रमाण अधिक असून, ९५ टक्क्यांपर्यंत कर्ज वसुली हाेईल, अशी अपेक्षा आहे. - सतीश आयलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, गडचिराेली 

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbankबँक