शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

वाहनांसह ५२ लाखांची दारू जप्त

By admin | Updated: February 24, 2016 01:13 IST

जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या नेतृत्वातील पथकाने ३२ लाखांची दारू पकडून नागपूर येथील ठोक विक्रेता अनंत जयस्वाल याच्यासह दोघाला अटक केली.

एकाच दिवशी : गडचिरोली एसडीपीओ पथक व पोलीस अधीक्षकाच्या दारूबंदी पथकाची कामगिरीगडचिरोली : जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या नेतृत्वातील पथकाने ३२ लाखांची दारू पकडून नागपूर येथील ठोक विक्रेता अनंत जयस्वाल याच्यासह दोघाला अटक केली. जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या विशेष दारूबंदी पथकाने मंगळवारी सापळे रचून तीन वाहनांसह २० लाखांवर दारूसाठा जप्त केला आहे. यावर्षातील पोलीस विभागाची ही सर्वात मोठी कारवाई अवैध दारूच्या व्यावसायिकांवर केली आहे.दारूबंदी पथकाने पकडला २० लाखांवर मालपोलीस अधीक्षकांच्या दारूबंदी पथकाने मंगळवारी विदेशी दारूची अवैध वाहतूक करणारे दोन चारचाकी वाहन वाकडी-शिवणीदरमयान शिवणी गावाच्या मुुख्य चौकात पकडले. या वाहनातून २० लाख ४७ हजार ८०० रूपयांची दारू व मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोटफोडी नदीच्या पुलाजवळ दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. कुरूड येथील चंद्रय्या गड्डमवार व जयरामपूर येथील अमित गोटपर्तीवार हे दोघे दोन चारचाकी वाहनाने विदेशी दारू आणत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोटफोडी नदी पुलाच्या आजुबाजुला सापळा रचून पोलीस पथकाने या वाहनांना पकडले. एमएच ३३ ए ४८२६ व एमएच ३३ ए २३४२ या वाहनात चंद्रय्या गड्डमवार, कैलाश प्रभाकर कन्नाके व लक्ष्मण मलय्या गोटपर्तीवार हे तिघे जण असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून २० लाख ८७ हजार ८०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला. लक्ष्मण गोटपर्तीवार याच्या वाहनातून अमित लक्ष्मण गोटपर्तीवार हा इसम पळून गेला. पोलिसांनी या चौघांविरूध्द मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई पथकाचे प्रमुख पोलीस निरिक्षक विनायक कोळी, पोलीस हवालदार कांबळे, परिमल बाला, ढवळे, चव्हारे, राठोड, दुधलकर, तायडे यांनी पार पाडली. (जिल्हा प्रतिनिधी)नागपूरच्या जयस्वालसह दोघांना अटकमध्य प्रदेशातून विनापरवाना नागपूर-आरमोरी मार्गे दारू आणली जात असल्याची गुप्त माहिती एसडीपीओ पथकाला प्राप्त झाली. त्यानुसार गडचिरोली तालुक्यातील येवली गावाजवळ सापळा रचून टाटा आयसर वाहन अडवून चौकशी केली असता, वाहनामध्ये १४ लाख ४४ हजार ४०० रूपये किमतीची दारू आढळून आली. दारूसह वाहन जप्त करण्यात आले. सदर कारवाई २३ फेब्रुवारीच्या रात्री १२.३० वाजताच्या दरम्यान करण्यात आली. मागील काही दिवसांपासून मध्य प्रदेश राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे या दारूवर उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने पाळत ठेवली होती. मध्यप्रदेशातून टाटा आयसर एमएच ४० एके ४२६८ या वाहनाने मंगळवारी दारू आणली जाणार आहे, अशी गुप्त माहिती एसडीपीओ पथकाला प्राप्त झाली. त्यानुसार एसडीपीओ पथकाने येवली येथे नाकाबंदी करून वाहन अडविले. वाहनाची चौकशी केली असता, वाहनामध्ये गोवा स्पेशल विस्की कंपनीच्या ३०१ पेट्या आढळून आल्या. त्याची किमत १४ लाख ४४ हजार ८०० रूपये एवढी होते. २०० नग प्लास्टिकचे रिकामे ट्रे सुध्दा वाहनामध्ये होते. त्याची किमत चार हजार रूपये व टाटा आयसर वाहन असे एकूण ३२ लाख ४८ हजार ४०० रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.दारूची वाहतूक करणारे आरोपी अनंत सुनील जयस्वाल (३२) रा. एमआयडीसी नागपूर, मोहम्मद शोयब मोहम्मद शकील शेख (२५) रा. जाफरनगर नागपूर या दोघांना पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात मुंबई दारूबंदी कायदा कलम ९८ (क), ८५, ६५ (अ), (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्यासह पोलीस उपनिरिक्षक सिरसाठ, पोलीस हवालदार राजेंद्र तितीरमारे, सहायक फौजदार दोनाडकर, पोलीस हवालदार राऊत, श्रीनिवास, नाईक पोलीस दीपक डोंगरे, हिरामन आतला, अमोल बोरघरे, मंगेश तिवाडे यांनी केली. (नगर प्रतिनिधी)