शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीच्या कामांचे ५०३ प्रस्ताव पडले धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 23:47 IST

जिल्ह्यातील विविध गावांमधील दहन-दफनभूमीत (स्मशानभूमी) करावयाच्या विविध कामांसाठी जिल्हा परिषदेने तब्बल ५०३ ग्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविले आहेत.

ठळक मुद्दे९.२२ कोटींचा निधी परतीच्या मार्गावर : पाच महिन्यानंतरही दखल नाही

मनोज ताजने ।आॅनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्ह्यातील विविध गावांमधील दहन-दफनभूमीत (स्मशानभूमी) करावयाच्या विविध कामांसाठी जिल्हा परिषदेने तब्बल ५०३ ग्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविले आहेत. मात्र साडेपाच महिने लोटले तरी त्यापैकी एकाही प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. त्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी न दिल्यास दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेकडे पडून असलेला ९ कोटी २२ लाख रुपयांचा निधी ३१ मार्चनंतर पुन्हा शासनाकडे परत जाणार आहे.ग्रामपंचायतींना विशेष अनुदान योजनेअंतर्गत स्मशानभूमीतील गैरसोयी दूर करण्यासाठी २०१० पासून विशेष निधी दिला जातो. त्यानुसार २०१६-१७ मध्ये गडचिरोली जिल्हा परिषदेला ९.२२ कोटींचा निधी मिळाला होता. परंतू त्यावर्षी या योजनेचे प्रस्तावच मंजुरीसाठी गेले नाही. दरम्यान जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने २०१६-१७ आणि २०१७-१८ अशा दोन वर्षातील ५०३ प्रस्तावांची यादी गेल्या २९ सप्टेंबर २०१७ ला जिल्हा नियोजन समितीकडे पाठविली. मात्र आता साडेपाच महिने लोटून चालू आर्थिक वर्षही संपत आले तरीही त्या प्रस्तावांना मंजुरी मिळालेली नाही.जिल्हा परिषदेने मंजुरीसाठी पाठविलेल्या ५०३ प्रस्तावांची एकूण किंमत ४१ कोटी १६ लाख ५० हजार रुपये आहे. सध्या जि.प.कडे ९ कोटी २२ लाख उपलब्ध असून २०१७-१८ मधील नियतव्यय मंजूर असलेले ३ कोटी रुपये शासनाकडून मिळायचे आहे. अशा एकूण १२ कोटी २२ लाख रुपयांच्या प्रस्तावांची निवड करून त्यांना जिल्हा नियोजन समितीकडून मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. ज्या गावांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळेल त्या गावच्या ग्रामपंचायतींकडे तो निधी लगेच वळता केला जाईल.बैठकीत चर्चाच नाही?विशेष म्हणजे सप्टेंबरमध्ये प्रस्ताव सादर केल्यानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. पण त्या बैठकीत या प्रस्तावांवर चर्चाच झाली नाही. त्यासाठी कोणाचा दुर्लक्षितपणा कारणीभूत आहे याचा पालकमंत्र्यांना शोध घ्यावा लागणार आहे. आता नवीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुढाकार घेऊन मंजुरीसाठी प्रस्तावांची तातडीने निवड केल्यास आणि पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी मंजुरी दिल्यास ही कामे मार्गी लागून पावसाळ्यापूर्वी स्मशानभूमींमध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकतात.चामोर्शी व सिरोंचा तालुक्यातून सर्वाधिक प्रस्तावजिल्हाभरातून आलेल्या ५०३ गावांमधील प्रस्तावांमध्ये सर्वाधिक ७७ प्रस्ताव चामोर्शी तालुक्यातील आहेत. सिरोंचा तालुक्यातील ७४, कुरखेडा तालुक्यातील ६१, अहेरी तालुक्यातील ५१, धानोरा तालुक्यातील ५०, कोरची तालुक्यातील ३७, आरमोरी तालुक्यातील ३२, एटापल्ली तालुक्यातील ३२, गडचिरोली तालुक्यातील २५, मुलचेरा तालुक्यातील २६, देसाईगंज २० तर सर्वात कमी भामरागड तालुक्यातील १८ प्रस्तावांचा समावेश आहे.ग्रामपंचायतींकडून प्रत्येकी ५ ते १० लाखांची कामेशासनाच्या निकषानुसार स्मशानभूमीतील कामांसाठी आलेल्या प्रस्तावांमध्ये ५ ते १० लाखांपर्यंतच्या कामांचा समावेश आहे. त्यात प्रामुख्याने शेडचे बांधकाम, सिमेंट रस्ता, मोरी, चबुतऱ्याचे बांधकाम, बोअरवेल खोदणे, जलशुद्धीकरण (आर.ओ.मशिन) यंत्र बसविणे आदी कामांचा समावेश आहे.