शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

500 जि.प. कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाने हाेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 05:00 IST

राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी १४ जुलै राेजी पत्र काढून जिल्हा परिषदेंतर्गत वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश जि.प. प्रशासनाने दिले. त्यानुसार गडचिराेली जिल्हा परिषदेच्या वतीने संवर्गनिहाय विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांच्या बदलीचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. विभागनिहाय ही बदली प्रक्रिया २७ ते ३१ जुलै २०२१ यादरम्यान हाेणार आहे. यादी पाहण्यासाठी बदलीपात्र कर्मचारी जि.प.कडे धाव घेत आहेत.

ठळक मुद्देशासनाच्या निर्णयानंतर जि.प. प्रशासन लागले कामाला

दिलीप दहेलकरलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार दरवर्षी जिल्हा परिषदेमार्फत ३१ मेपर्यंत कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबविली जाते. मात्र, काेराेना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे ३० जून २०२१ पर्यंत काेणत्याही बदल्या करण्यात येऊ नयेत, असे शासनाचे निर्देश हाेते. दरम्यान, ९ जुलै २०२१ च्या नव्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदली प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार जि.प. प्रशासनाच्या वतीने बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, १५ टक्क्यांनुसार जवळपास ५०० कर्मचाऱ्यांच्या बदल्या हाेणार आहेत.राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी १४ जुलै राेजी पत्र काढून जिल्हा परिषदेंतर्गत वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश जि.प. प्रशासनाने दिले. त्यानुसार गडचिराेली जिल्हा परिषदेच्या वतीने संवर्गनिहाय विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांच्या बदलीचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. विभागनिहाय ही बदली प्रक्रिया २७ ते ३१ जुलै २०२१ यादरम्यान हाेणार आहे. यादी पाहण्यासाठी बदलीपात्र कर्मचारी जि.प.कडे धाव घेत आहेत. आपल्या नावाची खातरजमा करीत आहेत.

पारदर्शकपणे हाेणार प्रक्रियाजिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची ही सर्वसाधारण बदली प्रक्रिया पारदर्शकपणे हाेणार असून, जि.प. च्या राष्ट्रीय शहीद वीर बाबूराव शेडमाके सभागृहात समुपदेशनाने बदल्यांची कार्यवाही पार पाडण्यात येणार आहे, अशी माहिती जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. या बदली प्रक्रियेकरिता बदलीपात्र कर्मचाऱ्यांची संवर्गनिहाय अंतिम सेवाज्येष्ठता यादी जि.प.च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी वेळापत्रकानुसार बदली प्रक्रियेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन सीईओ आशीर्वाद यांनी केले आहे. 

संचमान्यतेत अडकल्या माध्यमिक शिक्षकांच्या बदल्या- गडचिराेली जिल्हा परिषदेंतर्गत जिल्हाभरात १० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये अनेक माध्यमिक शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, या शाळांची संच मान्यता न झाल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक सहायक शिक्षकांच्या बदल्या हाेणार नाहीत. - पूर्वी शासकीय माध्यमिक शाळांची संचमान्यता दरवर्षी केली जात हाेती. मात्र, आता शासनाच्या वतीने चार ते पाच वर्षांनी संचमान्यता केली जाते. गतवर्षी सन २०१९-२० मध्ये संचमान्यतेअभावी माध्यमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाहीत. याहीवर्षी बदल्या रखडल्या आहेत. परिणामी, अहेरी उपविभागातील शिक्षक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

...असे आहे वेळापत्रक२७ जुलै राेजी सामान्य प्रशासन व वित्त विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या हाेणार आहेत. २८ जुलैला महिला व बालकल्याण, सिंचन, बांधकाम, पशुसंवर्धन व कृषी आदी पाच विभागांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या हाेतील. २९ जुलैला आराेग्य विभागातील आराेग्यसेवक महिला व पुरुष, यांत्रिकी, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, तसेच ३० जुलै राेजी आराेग्य विभागातील आराेग्य सहायक, औषधनिर्माण अधिकारी, प्रयाेगशाळा तंत्रज्ञ व आराेग्य पर्यवेक्षकांच्या बदल्या हाेणार आहेत. याशिवाय ३१ जुलै राेजी पंचायत विभाग, तसेच शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी आदींच्या बदल्या हाेणार आहेत.

 

टॅग्स :Transferबदली