मंडळातर्फे तयारी पूर्ण : शुक्रवारी देसाईगंजात शिबिरदेसाईगंज : संत निरंकारी मंडळ शाखा देसाईगंजच्या वतीने येथील वन विभागाच्या कार्यालयाजवळील संत निरंकारी सत्संग भवनात २९ एप्रिल रोजी शुक्रवारला सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी संत निरंकारी मंडळाच्या वतीने तयारी जोरात सुरू असून या रक्तदान शिबिरासाठी आतापर्यंत ५०० युवकांनी नोंदणी केली आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून आ. क्रिष्णा गजबे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता आदी उपस्थित राहणार आहेत. संत निरंकारी मंडळातर्फे गतवर्षी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ४३६ जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. दरवर्षी प्रमाणे यंदाही संत निरंकारी मंडळातर्फे २९ एप्रिलला संत निरंकारी सत्संग भवन देसाईगंज, २५ मे रोजी ग्रामीण रूग्णालय मूल, ३१ आॅगस्ट रोजी ग्रामीण रूग्णालय मालेवाडा, २० सप्टेंबर रोजी संत निरंकारी सत्संग भवन कुरखेडा व २५ सप्टेंबर २०१६ रोजी जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे रक्तदान शिबिर होणार आहे. रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य करावे, असे आवाहन हरिष निरंकारी, आसाराम निरंकारी, नानकराम कुकरेजा, किसन नागदेवे, गजानन तुनकलवार, राजेश गुंडेवार, वसंत मेडेवार व अन्य पदाधिकारी यांनी केले आहे.
रक्तदानासाठी ५०० जणांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2016 01:09 IST