शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

५० किमीच्या नाल्या रखडल्या

By admin | Updated: April 27, 2015 01:12 IST

संपूर्ण शहरात सद्यस्थितीत १४२ किमीच्या नाल्यांचे बांधकाम करण्यात आले असून ५० किमींच्या नाल्या अजूनही बांधण्यात आल्या नाही.

गडचिरोली : संपूर्ण शहरात सद्यस्थितीत १४२ किमीच्या नाल्यांचे बांधकाम करण्यात आले असून ५० किमींच्या नाल्या अजूनही बांधण्यात आल्या नाही. या नाली बांधकामासाठी जवळपास १५ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. गडचिरोली शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याबरोबर शहराचा विस्तारही वाढत चालला आहे. लोकवस्ती निर्माण झाल्यानंतर त्या परिसरात रस्ते व नालीचे बांधकाम करणे, पाण्याचा पुरवठा करणे ही जबाबदारी नगर परिषदेला उचलावी लागते. नगर परिषदेच्या मार्फतीने सद्यस्थितीत सुमारे १४२ किमीच्या नाल्या शहरात बांधण्यात आल्या आहेत. मात्र बऱ्याच नवीन वस्त्यांमध्ये पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही नालींचे बांधकाम करण्यात आले नाही. शहराच्या स्वच्छतेत नाल्यांचे विशेष महत्त्व आहे. घरातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी प्रत्येक वार्डात रस्त्याच्या बाजुला नाल्या असणे आवश्यक आहे. मात्र अनेक वार्डांमध्ये नाली बांधकाम झाला नसल्याने या वार्डातील पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरते. काही रस्त्यांवर सांडपाणी वाहत असल्याने रस्तेही खराब झाले आहेत. त्यामुळे नवीन वस्तीतील नागरिकांनी नगर परिषदेकडे नालीचे बांधकाम करण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. मात्र नगर परिषद निधी नसल्याचे कारण पुढे करीत नाली बांधकाम करण्यास टाळाटाळ करीत आहे. जवळपास ५० किमीच्या नाल्या अजूनही बांधण्यात आल्या नाही. या नाल्यांच्या बांधकामासाठी पंधरा कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. नवीन वार्डांबरोबरच काही जुन्या वार्डांमध्येही नाल्यांचे बांधकाम अपूर्ण करण्यात आल्या आहे. अनेक नाल्यांची मागील काही वर्षांपासून डागडुजी करण्यात आली नाही. नालीच्या दोन्ही बाजू नालीमध्ये कोसळल्या आहेत. काही ठिकाणी नालीचे अस्तित्वच दिसत नाही. अशा तुटलेल्या नाल्या उपसताना कामगार वर्गालाही तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे मजूरवर्ग सदर नाल्या उपसण्यास टाळाटाळ करतात. परिणामी या नाल्यांमध्ये गाळ व पाणी साचून त्यांची दुर्गंधी निर्माण होते. या दुर्गंधीचा त्रास सभोवतालच्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी निधी मिळावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला असला तरी अजूनपर्यंत यासाठी निधी प्राप्त झाला नाही. (नगर प्रतिनिधी)