शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

अपेक्षित प्रमाणाच्या ६३ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 23:49 IST

मागील दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली असली तरी अपेक्षित पावसाच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमीच झाला आहे. २७ जुलैपर्यंत ६३७.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात ४०२.१ मिमी पाऊस पडला आहे.

ठळक मुद्देतलाव भरलेच नाही। १ जूनपासून २७ जुलैपर्यंत ४०२ मिमी पाऊस पडल्याची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली असली तरी अपेक्षित पावसाच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमीच झाला आहे. २७ जुलैपर्यंत ६३७.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात ४०२.१ मिमी पाऊस पडला आहे.यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दगा दिला आहे. अगदी सुरुवातीला काही दिवस पाऊस झाला नाही. त्यानंतर सतत १० दिवस पाऊस पडला. त्यामुळे पेरण्या व धानाचे पऱ्हे टाकण्याचे काम थांबले होते. त्यानंतर पावसाने सुमारे १५ दिवस दडी मारली होती. धानाचे पऱ्हे व इतर पिके पावसाअभावी करपण्यास सुरुवात झाली होती. सुदैवाने पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने धानाचे पऱ्हे व इतर पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तरीही अपेक्षित पावसाच्या तुलनेत प्रत्यक्षात पाऊस कमी प्रमाणातच झाला आहे. १ जून ते २७ जुलै पर्यंत ६३७.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ४०२.१ मिमी एवढाच पाऊस पडला. अपेक्षित पावसाच्या यावर्षी पडलेल्या पावसाची टक्केवारी ६३ एवढी आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने तलाव, बोड्यांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाला नाही. त्यामुळे धानपीक उत्पादक शेतकरी अजुनही चिंतेत आहे.धान पिकाला शेवटपर्यंत पाण्याची गरज भासते. त्यामुळे तलाव, बोड्या न भरल्यास सिंचनाची अडचण जाणार आहे.चामोर्शी तालुक्यात सर्वात कमी पाऊस१२ तालुक्यांपैकी चामोर्शी तालुक्यात यावर्षी सर्वात कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या तालुक्यात यावर्षी २७ जुलैपर्यंत केवळ २५२.७ मिमी पाऊस पडला आहे. भामरागड तालुक्यात सर्वाधिक ५५८.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. गडचिरोली तालुक्यात ३७१.४ मिमी, धानोरा ४३८ मिमी, मुलचेरा ३०७ मिमी, देसाईगंज ६६७ मिमी, आरमोरी ४१७ मिमी, कुरखेडा ४४२ मिमी, कोरची ४६३ मिमी, अहेरी ४४५ मिमी, सिरोंचा ३१७ मिमी, एटापल्ली ४४५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सर्वच तालुक्यांमध्ये अपेक्षित पावसाच्या कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे, चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र याच तालुक्यात कमी पाऊस झाला आहे.वार्षिक सरासरीच्या २९ टक्के पडला पाऊसगडचिरोली जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत सरासरी १३५४.७ मिमी पाऊस पडते. यावर्षी २७ जुलैपर्यंत ६३७.८ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. एकूण वार्षिक सरासरीच्या केवळ २९.७ मिमी पाऊस झाला आहे. सुमारे ७० टक्के पाऊस अजून पडणे बाकी आहे. विशेषत: जुलै, आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस पडत असल्याचा अनुभव आहे. मात्र यावर्षी जुलै महिन्यातील बहुतांश दिवस कोरडे गेले. त्यामुळे आॅगस्ट महिन्यात किती पाऊस पडते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पुढील महिन्यात पाऊस न झाल्यास धान पिकाला धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहे.

टॅग्स :Rainपाऊस