शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी 48 कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 05:00 IST

बुधवारी ७५० कोरोना तपासण्यांचा अहवाल आला. त्यात वेगवेगळ्या ठिकाणचे २४ कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ३० हजार ८७८ वर पोहोचली आहे. दिवसभरात एकही कोरोनामुक्त झाला नाही. त्यामुळे सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या वाढून ३७ वर गेली. त्यात नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ११ आणि अहेरी तालुक्यातील ११, चामोर्शी तालुक्यातील १, धानोरा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/आष्टी : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असताना बुधवारी अचानक ४८ रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी ही धोक्याची घंटा ठरली आहे.बुधवारी ७५० कोरोना तपासण्यांचा अहवाल आला. त्यात वेगवेगळ्या ठिकाणचे २४ कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ३० हजार ८७८ वर पोहोचली आहे. दिवसभरात एकही कोरोनामुक्त झाला नाही. त्यामुळे सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या वाढून ३७ वर गेली. त्यात नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ११ आणि अहेरी तालुक्यातील ११, चामोर्शी तालुक्यातील १, धानोरा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, आष्टी येथील लिटिल हार्ट इंग्लिश शाळेतील विद्यार्थ्यांच्या कोरोना तपासणीत काही विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नववर्षाचा कार्यक्रम पडला महागात आष्टी येथील लिटिल हार्ट इंग्लिश मीडियम स्कूलमधील काही विद्यार्थ्यांना ताप असल्याने बुधवारी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात २४ विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे शाळा प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. परिसरात पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.             सदर शाळेत १ जानेवारीला नवीन वर्षाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये बाहेरगावचे माजी विद्यार्थीसुद्धा उपस्थित होते. दिवसभर विविध कार्यक्रम सुरू होते. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना ताप आला. त्यामुळे बुधवारी सकाळी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात १३१ विद्यार्थ्यांची अँटिजन टेस्ट केल्यानंतर २४ विद्यार्थ्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. यामध्ये वर्ग ७ ते ११ वीचे विद्यार्थी आहेत. यातील शाळेच्या हॉस्टेलचे विद्यार्थी जास्त आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना गडचिरोली येथे उपचारासाठी नेणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बिधान देवरी यांनी सांगितले.

शाळा सुरू ठेवण्याबाबत आज चर्चा-    कोरोनाचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील शाळा बंद होतील का, अशी चिंता अनेक पालकांना आहे. काहींना कोरोनाची भीती आहे, तर काहींना शाळा बंद होईल तर मुलांचे पुन्हा शैक्षणिक नुकसान होईल, असे वाटते. याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली जाईल, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.-    दरम्यान आष्टीत ज्या शाळेत काेराेनाचे रुग्ण आढळले त्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचीही काेराेना तपासणी केली जाणार आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या