सिराेंचा तालुक्यातील अतिसंवेदनशील गाव म्हणून ओळख असलेल्या गुमलकोंडा येथे जवळपास १३ दारूविक्रेते सक्रिय असून, जवळच्या तेलंगणा राज्यातून दारूची तस्करी करीत गावात विक्री करतात. गाव संघटनेने वारंवार सूचना देऊनही मुजोर दारूविक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला. यामुळे गावातील महिलांसह इतर लोकांना त्रास सहन करावा लागत होता. यावर उपाययोजना करण्यासाठी अहिंसक कृतीचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूने गावातील तीन दारूविक्रेत्यांच्या घराची पाहणी केली. दरम्यान, एका घरात ४६ हजार रुपयांची विदेशी दारू आढळून आली. या घटनेची माहिती आसरअल्ली पोलिसांना देत संपूर्ण मुद्देमालासह आरोपीस पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलीस निरीक्षक मंदार पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
===Photopath===
050521\05gad_5_05052021_30.jpg
===Caption===
गाव संघटनेने जप्त केलेली दारू.