शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

४६ बंगाली शाळा चालताहेत पुस्तकांविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:44 IST

चामोर्शी व मुलचेरा तालुक्यात बंगाली माध्यमाच्या एकूण ४६ शाळा आहेत.

शिक्षण विभाग म्हणते, प्रिंटिंग सुरू : ३ हजार १५० विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जिल्हा परिषदेचा खेळलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चामोर्शी व मुलचेरा तालुक्यात बंगाली माध्यमाच्या एकूण ४६ शाळा आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पुरविण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेवर आहे. शाळा सुरू होऊन २० दिवसांचा कालावधी उलटला तरी अजूनपर्यंत पाठ्यपुस्तके पोहोचली नाहीत. याबाबत पालकांनी जिल्हा परिषदेकडे विचारणा केली असता, पाठ्यपुस्तकांची प्रिंटिंग सुरू आहे, असे उत्तर जिल्हा परिषदेमार्फत दिले जात आहे. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिवाळीनंतर उपलब्ध करून देणार काय, असा उपहासात्मक प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. मुलचेरा व चामोर्शी तालुक्यात बंगाली समाज वास्तव्यास आहे. या नागरिकांची मातृभाषा बंगाली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण विभागाने मुलचेरा तालुक्यात २३ व चामोर्शी तालुक्यात २३ अशा एकूण ४६ शाळांमध्ये बंगाली माध्यम सुरू केले आहे. बंगाली माध्यमाचे शिक्षण पहिली ते पाचवीपर्यंत दिले जाते. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना हिंदी माध्यमाच्या शाळांमध्ये टाकले जाते. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. राज्यभरात बंगाली माध्यमाच्या शाळा केवळ गडचिरोली जिल्ह्यात आहेत. एवढ्या कमी विद्यार्थ्यांसाठी पुस्तके छापणे पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम मंडळाला शक्य नाही. त्यामुळे बंगाली माध्यमाची पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याची जबाबदारी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागावर सोपविण्यात आली आहे.शाळेच्या पहिल्या दिवशीच पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावी, यासाठी इतर माध्यमाची पुस्तके उन्हाळ्यातच पुरविली जातात व शाळेच्या पहिल्याच दिवशी त्याचे वितरण केले जाते. मात्र बंगाली माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग नेहमीच अन्याय करीत आला आहे. आजपर्यंत कधीच पहिल्या दिवशी बंगाली माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध झाली नाहीत. यावर्षी सुध्दा शाळा सुरू होऊन आता २० दिवसांचा कालावधी उलटला तरी पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली नाहीत. याबाबत संबंधित विद्यार्थ्यांचे पालक जिल्हा परिषद प्रशासनाच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. जिल्हा परिषदेने तत्काळ पुस्तकांचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. मात्र बंगाली माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पुस्तकेच उपलब्ध नाही. त्यामुळे सदर विद्यार्थी अध्यापन कसे करीत असावे व त्यांची गुणवत्ता कशी काय वाढणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. दस्तरखुद्द शिक्षणाधिकाऱ्यांनी शांतीग्राम बंगाली माध्यमाच्या शाळेला भेट दिली असता, चवथ्या वर्गाच्या एकाही विद्यार्थ्याला बंगाली भाषा वाचता आली नाही.नियोजनाचा अभाव बंगाली भाषेची पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेवर आहे. त्यामुळे उन्हाळ्यातच नियोजन करून पाठ्यपुस्तके छापल्यास शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देणे शक्य आहे. मात्र शिक्षण विभाग शाळा सुरू झाल्याशिवाय पाठ्यपुस्तके छपाईचे काम सुरू करीत नाही. पावसाळा सुरू झाल्यानंतर ऐन वेळेवर घर बांधण्यासाठी सुरू करणाऱ्या माकडाची फजिती होते, या कहाणीच्या माध्यमातून वेळेचे महत्त्व सांगणारा शिक्षण विभाग मात्र वेळेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.बंगाली माध्यमाच्या पाठ्यपुस्तकांची प्रिंटिंग करण्याचे काम शिक्षण विभागाने सुरू केले आहे. पाठ्यपुस्तकांचा तत्काळ पुरवठा करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नरत आहे. प्रिंटिंग होताच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातील. - एम. एन. चलाख, प्रभारी शिक्षणाधिकारी, गडचिरोली