एटापल्ली : गाव विकासासाठी एटापल्ली तालुक्यातील ४५ गावांनी पुढाकार घेत ‘ग्रामपंचायत निवडणूक -दारूमुक्त निवडणूक’ करण्याचा ठराव घेतला आहे. निवडणुकीदरम्यान उमेदवारांना दारूचे वाटप करू देणार नाही, नशेत मतदान करणार नाही. असा निर्धारही या गावांनी केला आहे. यामुळे योग्य उमेदवाराची निवड करून ग्राम विकासाला चालना मिळण्यास मदत होईल.
तालुक्यातील आलदंडी, पंदेलवाही, करेम, घोटसुर, गुंडम, टाळीगुडम, येमली, कांदळी, मुसारामगुंडा, वेनसर, तुमरगुंडा, तुमरगुंडा बु, बरसेवाडा, पंदेवाही, मंगर, हेड्री, इटालणार, परसलगोंदी, डुमे, बांडे, पर्सलगोंदी स, सुरजागड, जवेली, उडेरा, बुर्गी, पुन्नूर, वाघेझरी, वाघेझरी म., जवेली खु., जिजावंडी, बुर्गी स., कोटाकोंडा बु, सोहगाव, मांझीगड, वांडोली, सिनभट्टी, भापडा, तांबडा स., तांबडा म., ताडपल्ली अ., कोंदावाही म., पैमा, गेदा, चंदनवेली, गुरुपल्ली ही गावे दारूमुक्त निवडणुकीसाठी प्रयत्न करणार आहेत. तसेच ग्रामपंचायत निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांकडून ‘दारूचे वाटप करणार नाही’ असा वचननामा देखील लिहून घेण्यात आलेला आहे.