शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

अहेरी उपविभागात रविवारी ४५ उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Updated: February 6, 2017 01:38 IST

अहेरी उपविभागात दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नामांकन पत्र दाखल करण्याच्या कामाला गती आली आहे.

दुसरा टप्पा : जि.प.साठी १८ तर पं.स.साठी २७ नामांकन गडचिरोली : अहेरी उपविभागात दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नामांकन पत्र दाखल करण्याच्या कामाला गती आली आहे. रविवारी एकाच दिवशी अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा या चारही तालुक्यात मिळून एकूण ४५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा परिषद क्षेत्रासाठी १८ व पंचायत समिती गणासाठी २७ नामांकन अर्जांचा समावेश आहे. अहेरी तालुक्यात जिल्हा परिषद क्षेत्रासाठी आठ व पंचायत समिती गणासाठी सात असे एकूण १५ नामांकन पत्र रविवारी दाखल करण्यात आले. सिरोंचा तालुक्यात जिल्हा परिषद क्षेत्रासाठी चार व पंचायत समिती गणासाठी आठ असे एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भामरागड तालुक्यात जि.प. क्षेत्रासाठी दोन व पंचायत समिती गणासाठी पाच असे एकूण सात नामांकन अर्ज रविवारी दाखल करण्यात आले. एटापल्ली तालुक्यात जि.प. क्षेत्रासाठी चार व पंचायत समिती गणासाठी सात असे एकूण ११ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. रविवारी अहेरी तालुक्यात वेलगूर-आलापल्ली जि.प. क्षेत्रासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हकीम अब्दुल जमीर, अपक्ष म्हणून तोडसाम संतोष शंकर, बसपातर्फे भोयर बोलू अनिल यांनी नामांकन पत्र दाखल केले. जिमलगट्टा-पेठा जिल्हा परिषद क्षेत्रासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पोरतेट ऋषी बोंदय्या तर बसपातर्फे हिचामी समीर रावजी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पेरमिली-राजाराम जि.प. क्षेत्रासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वेलादी ललिता सन्याशी यांनी नामांकन अर्ज दाखल केला. रेपनपल्ली-उमानूर जि.प. क्षेत्रासाठी राकाँतर्फे आत्राम रामेश्वरराव जगन्नाथ तर राकाँतर्फेच महागाव-देवलमारी जि.प. क्षेत्रासाठी आत्राम नेहा रवींद्रराव यांनी रविवारी नामांकन अर्ज दाखल केला. देवलमरी पंचायत समिती गणासाठी राकाँतर्फे गजभिये प्रज्ञा प्रकाश, महागाव बू गणासाठी राकाँतर्फे आत्राम हर्षवर्धन धर्मरावबाब यांनी नामांकन अर्ज दाखल केला. वेलगूर गणासाठी अपक्ष म्हणून कांबळे अनिल रामाजी, आलापल्ली गणासाठी राकाँतर्फे कोरेत कैलाश गणपत, पेरमिली गणासाठी अपक्ष म्हणून दुर्गे शंकर मलय्या यांनी रविवारी नामांकन अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमानूर पं.स. गणासाठी सडमेक शांता बिचू तर पेरमिली गणासाठी दहागावकर बंडू मलिग्या यांनी नामांकन अर्ज दाखल केला. सिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर जि.प. क्षेत्रासाठी राकाँतर्फे सिडाम वैशाली दामोधर, सिडाम सरीता सीरिया यांनी नामांकन अर्ज दाखल केला. विठ्ठलरावपेठा-जाफ्राबाद जि.प क्षेत्रासाठी राकाँतर्फे माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री धर्मरावबाबा आत्राम तर राकाँतर्फे नारायणपूर-जानमपल्ली जि.प. क्षेत्रासाठी जाडी पल्लवी शिवय्या यांनी रविवारी नामांकन अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे झिंगानूर पं.स. गणासाठी गावडे कमला बोडका, आसरअल्ली गणासाठी गावडे तुळशीराम समय्या, जाफ्राबाद पं.स. गणासाठी निलम वैशाली रामकिष्टू, निलम स्वामी व्यंकटस्वामी, आदे सुशिला पोचन्ना यांनी नामांकन पत्र दाखल केले. जानमपल्ली पं.स. गणासाठी अपक्ष म्हणून ताल्ला व्यंकटेशम पोचम, अय्यला नागेश समय्या यांनी नामांकन अर्ज दाखल केला तर लक्ष्मीदेवीपेठा पं.स. गणासाठी अपक्ष म्हणून कुमरी सडवली समय्या यांनी रविवारी नामांकन अर्ज दाखल केला. भामरागड तालुक्यातील आरेवाडा-नेलगुंडा जिल्हा परिषद क्षेत्रासाठी भाजपातर्फे सडमेक मनोहर लालसाय, कोठी-मन्नेराजाराम क्षेत्रासाठी भाजपातर्फे नरोटे रूक्मिणी चैतू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आरेवाडा पं.स. गणाकरिता अपक्ष म्हणून कुंजामी तनुजा बाजीराव, भाजपातर्फे कुमरे निलाबाई मनोहर, नेलगुंडा गणाकरिता अपक्ष म्हणून बोगामी लता सुधाकर, भाजपातर्फे भांडेकर दीपक पत्रू, कोठी पं.स. गणात भाजपातर्फे सडमेक निर्मला शंकर यांनी अर्ज सादर केले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क) चार तालुक्यात आतापर्यंत ६१ अर्ज दुसऱ्या टप्प्यात एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा या चार तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. १ फेब्रुवारीपासून ५ फेब्रुवारी रविवारपर्यंत चारही तालुके मिळून जि.प. क्षेत्रासाठी एकूण २५ उमेदवारी अर्ज तर पं.स. गणाकरिता ३६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये एटापल्ली तालुक्यात जि.प.साठी चार, पं.स. गणासाठी आठ, भामरागड तालुक्यात जि.प.साठी दोन व पं.स. गणाकरिता पाच अर्ज प्राप्त झाले आहेत. अहेरी तालुक्यात दोन्ही मिळून २१ तर सिरोंचा तालुक्यात एकूण २१ अर्ज प्राप्त झाले आहे.