शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

२४ तासांपासून ४५ गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:32 IST

मंगळवारी सायंकाळपासून झालेल्या वादळी पावसामुळे घोट व परिसरातील शेतकऱ्यांच्या रबी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मंगळवारी रात्री ९ वाजता या भागातील वीज पुरवठा खंडित झाला.

ठळक मुद्देघोट परिसर : वादळी वाºयासह पाऊस व गारपीट

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : मंगळवारी सायंकाळपासून झालेल्या वादळी पावसामुळे घोट व परिसरातील शेतकऱ्यांच्या रबी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मंगळवारी रात्री ९ वाजता या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. तब्बल २४ तासानंतरही वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने जवळपास ४० ते ४५ गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला.घोट परिसरात मंगळवारी सायंकाळपासूनच वातावरण बदल झाला. त्यानंतर ७ ते ७.३० वाजतापासून वादळी पावसाला सुरूवात झाली. दरम्यान लहान स्वरूपात गारपीटही झाली. त्यामुळे या परिसरात अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेले उडीद, मूग, हरभरा, जवस, पोपट, वटाणा, मटकी यासह अन्य कडधान्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले. घोट येथील ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या ४० ते ४५ गावातील वीज पुरवठा मंगळवारच्या ९ वाजतापासून बुधवारी रात्री उशिरापर्यंत खंडितच होता. या संदर्भात महावितरणच्या अभियंत्यांना विचारणा केली असता, वीज दुरूस्तीचे काम सुरू आहे, असे सांगितले. परिसरात वादळ वाऱ्यासह पाऊस झाल्याने या भागातील वीज तारांवर झाडे कोसळली. मुलचेरा तालुक्याच्या काही भागातही वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना त्रास झाला.मुलचेरा तालुक्यात पिकांचे नुकसानमुलचेरा तालुक्यातील गणेशनगरसह परिसरात मंगळवारी रात्री अवकाळी पाऊस झाल्याने या भागातील शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले. गणेशनगर येथील मका, हरभरा तसेच भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला. त्यामुळे या भागातील नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार अनिरूद्ध कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. विदर्भ कृती समितीचे अध्यक्ष बादलशहा यांच्या नेतृत्त्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुभाष गणपती, निकुरे, शंकर हलदार, रंजीत मंडल, रामपद मंडल, लक्ष्मण बाला, विश्वनाथ मंडल, सुभाष पटेल उपस्थित होते. या संदर्भात नाराजी व्यक्त करीत महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी झालेल्या नुकसानीची पाहणी न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे, अशी प्रतिक्रिया मुलचेराचे नगराध्यक्ष सुभाष आत्राम यांनी दिली.