नऊ नगर पंचायती : सर्वाधिक चामोर्शीत २३ नामांकनगडचिरोली : जिल्ह्यातील नऊ नगर पंचायतपैकी पाच नगर पंचायत निवडणुकीसाठी मंगळवारपर्यंत एकूण ४४ नामांकन अर्ज दाखल झाले आहे. मंगळवारी एकाच दिवशी पाच नगर पंचायतीकरिता एकूण ३३ नामांकन अर्ज दाखल झाले. आतापर्यंत सर्वाधिक चामोर्शी नगर पंचायतीसाठी २३ नामांकन दाखल झाले. तर आतापर्यंत नऊ नगर पंचायती मिळून ७५२ नामांकन अर्जाची विक्री झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे. आतापर्यंत पाच नगर पंचायतीसाठी ४४ नामांकन अर्ज दाखल झाले. यामध्ये भामरागड १३, सिरोंचा १, अहेरी ५, एटापल्ली २, चामोर्शी नगर पंचायत निवडणुकीसाठी २३ नामांकन अर्ज दाखल झाले आहे. तर मंगळवारपर्यंत मुलचेरा, कोरची, धानोरा व कुरखेडा या चार नगर पंचायतीकरिता एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही. मंगळवारी एकाच दिवशी पाच नगर पंचायतीसाठी ३३ नामांकन अर्ज दाखल झाले. यामध्ये अहेरी पाच, सिरोंचा एक, एटापल्ली एक, भामरागड १३ व चामोर्शी नगर पंचायत निवडणुकीसाठी १३ नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. चामोर्शीमध्ये मंगळवारी नामांकन अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक २ मधून काँग्रेसच्या सुनिता संजय धोडरे, प्रभाग क्रमांक ३ मधून अपक्ष म्हणून घनश्याम मारोती शेट्ये, प्रभाग क्रमांक ५ मधून राकाँचे मारोती मधुकर दासलवार, प्रभाग क्रमांक ७ मधून भाजपच्या लोमा गंगाधर उंदीरवाडे, प्रभाग क्रमांक ८ मधून शिवसेनेतर्फे, हनुमंत कृष्णाजी डंबारे, प्रभाग क्रमांक ११ मधून काँग्रेसतर्फे राहूल सुखदेव नैताम, प्रभाग क्रमांक १२ मधून अपक्ष म्हणून मेहरूनीसा आसीम खान, प्रभाग १४ मधून अपक्ष सुधीर देवनाथ गडपायले, अपक्ष गोपाल मलय्या मेनेवार, अपक्ष म्हणून योगिता अमित साखरे, प्रभाग क्रमांक १६ मधून अपक्ष म्हणून मिनल मनोज पालारपवार आदींनी नामांकन अर्ज सादर केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
पाच नगर पंचायतीसाठी ४४ नामांकन दाखल
By admin | Updated: October 7, 2015 02:33 IST