शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

४३ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2017 00:46 IST

दुसऱ्या टप्प्यात २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सिरोंचा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीअंतर्गत तब्बल १३९ गावातील एकूण ४३ हजार २१३ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत.

सिरोंचा तालुक्यात ७६ मतदान केंद्र : १३९ गावांचा समावेश; महिलाराज राहणारसिरोंचा : दुसऱ्या टप्प्यात २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सिरोंचा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीअंतर्गत तब्बल १३९ गावातील एकूण ४३ हजार २१३ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत.तालुक्यात निवडणुकीसाठी एकूण ७६ मतदान केंद्र ठेवण्यात आले असून यामध्ये ३६ केंद्र अतिसंवेदनशील आहे. ३० मतदान केंद्र संवेदनशील तर १० मतदान केंद्र साधारण आहे. सिरोंचा येथे नगर पंचायत झाल्यामुळे सिरोंचा रै. व सिरोंचा माल (कोट्टागुडम), सूर्यापल्ली, धर्मपुरी या गावातील मतदार नगर पंचायत क्षेत्रात समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे येथील मतदारांना या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. सिरोंचा तालुक्यातील चारही जिल्हा परिषद क्षेत्र महिलांसाठी राखीव आहे. पंचायत समितीच्या आठ गणापैकी चार गण महिलांसाठी राखीव असल्याने सिरोंचा तालुक्यात महिलाराज राहणार आहे. गडचिरोली जिल्ह्याचा शेवटचा टोक व नक्षल प्रभावित क्षेत्र म्हणून सिरोंचा तालुक्याची ओळख आहे. तालुक्यातील झिंगानूर-आसरअल्ली जि. प. क्षेत्र अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव आहे. विठ्ठलराव पेठा-जाफ्राबाद जि. प. क्षेत्र अनुसूचित जमातीच्या महिलांसाठीच राखीव आहे. नारायणपूर-जानमपल्ली जि. प. क्षेत्र अनुसूचित जातीच्या महिलांसाठी तर लक्ष्मीदेवी पेठा-अंकिसा जि. प. क्षेत्रात नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. झिंगानूर पं. स. गण अनुसूचित जमाती महिलांसाठी तर आसरअल्ली, विठ्ठलराव पेठा हे दोन्ही गण याच प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. जाफ्राबाद पं. स. गणात चार ग्रामपंचायतीचा समावेश असून येथील जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. नारायणपूर गणाअंतर्गत चार ग्रामपंचायतीतील १६ गावे समाविष्ट असून येथील जागा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे. जानमपल्ली गणामध्ये सहा ग्रामपंचायतींचा समावेश असून येथील जागा नामाप्र महिलांसाठी राखीव आहे. लक्ष्मीदेवी पेठा गणात सहा ग्रा. पं. समाविष्ट असून येथील जागा अनुसूचित जाती महिलांसाठी तर अंकिसा गणाची जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या गणात चार ग्रामपंचायतीतील सात गावातील ६ हजार १६३ मतदारांचा समावेश आहे. सिरोंचा तालुक्यात या निवडणुकीत महिला उमेदवारांमध्ये प्रचंड चुरस आहे. (शहर प्रतिनिधी)