शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दुखण्याने त्रस्त ४२ नागरिकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:17 IST

शरीरातील एखाद्या भागात होत असलेल्या दीर्घकालीन वेदनेवर उपचारासाठी सर्च येथील माँ दंतेश्वरी धर्मदाय दवाखान्यात एक दिवसीय वेदनाशमन शिबीर घेण्यात आले. यामध्ये ४२ रुग्णांची तपासणी करून यातील आठ जणांवर या पद्धती अंतर्गत उपचार करण्यात आले.

ठळक मुद्देसर्चचा उपक्रम : मुंबई येथील तज्ज्ञांकडून करण्यात आले उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : शरीरातील एखाद्या भागात होत असलेल्या दीर्घकालीन वेदनेवर उपचारासाठी सर्च येथील माँ दंतेश्वरी धर्मदाय दवाखान्यात एक दिवसीय वेदनाशमन शिबीर घेण्यात आले. यामध्ये ४२ रुग्णांची तपासणी करून यातील आठ जणांवर या पद्धती अंतर्गत उपचार करण्यात आले.शरीराच्या एखाद्या भागावर ताण पडल्यास तो काही कालावधीकरिता दुखणे ही सामान्य बाब आहे. औषधोपचाराने काहीच दिवसात यापासून आराम मिळतो. पण वर्षानुवर्ष एकाच प्रकारच्या दुखण्याने काही जण त्रस्त असतात. औषध घेऊनही पाहिजे तसा फायदा होत नाही. त्यामुळे हे दुखणे त्यांचे रोजचे जगणे बाधित करते. परिणामी चालताना, बसताना प्रचंड यातना होतात. दुखण्याने झोप येत नाही. रोजची कामे करता येत नाही. अशा प्रकारच्या दुखण्यावर इलाज करणे आवश्यक ठरते. कंबर, मान, डोके, सांधे, गुडघे येथील दुखण्याचा यात समावेश असतो. सर्च मध्ये उपचारासाठी आलेल्या काही रुग्णांना अशा प्रकारचे दीर्घकालीन दुखणे असल्याचे लक्षात घेत ९ मार्च रोजी पेन क्लिनिक घेण्यात आले. यात एकूण ४२ रुग्णांची तपासणी करून त्यातील आठ रुग्णांवर या पद्धती अंतर्गत उपचार करण्यात आले. मुंबईतील पेन स्पेशालिस्ट डॉ. जितेंद्र जैन, डॉ. शाहनवाज आणि सर्च दवाखान्यात भूलतज्ञ म्हणून काम करणाऱ्या डॉ. शिल्पा मलिक यांनी रुग्णांवर उपचार केले. अनेकांना दीर्घकालीन दुखण्याचा त्रास असतो. अशा रुग्णांनी सर्च मध्ये येऊन तपासणी करून घेण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे. आगामी काळात होणाऱ्या वेदनाशमन शिबिराची तारीख त्यांना सांगितली जाणार आहे.पेन क्लिनिक उपचारपद्धतीदीर्घकालीन वेदनेने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी ही उपचारपद्धती उपयोगात आणली जाते. जास्त दुखणे असलेल्या भागाची तपासणी करून त्या भागावर किंवा दु:खाची सुरुवात असलेल्या जागेवर वेदनाशमन इंजेक्शन दिल्या जाते. तपासणी केल्यावर औषधोपचाराने दुखणे थांबणार नाही हे तपासूनच इंजेक्शन दिले जाते.